रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2024 (10:26 IST)

गोवा क्रांती दिवस

Goa K
वर्ष 1510 मध्ये पोर्तुगीजांनी बीजापुर सुल्तान यूसुफ आदिल शाहला हरवून गोवा आपल्या ताब्यात घेतले होते. या कामामध्ये पोर्तुगीजांची मदद त्यांचे एक स्थानीय सहयोगी तिमैया ने केली होती, यानंतर 450 वर्षांपर्यंत गोवामध्ये पोर्तुगीजांचे शासन होते.
 
18 जून गोवा करीत महत्वाची तारीख आहे. कारण या दिवशी गोवा स्वतंत्र झाले होते. स्वतंत्रता सेनानी आणि देशाचे मोठे सोशलिस्ट नेता राम मनोहर लोहिया यांचा खास याच्याशी संबंध होता. त्यांचे गोवा आजादी मध्ये खास योगदान आहे. 18 जूनला गोवा क्रांति दिवस साजरा केला जातो. भारत भले ही 15 ऑगस्ट ला 1947 स्वतंत्र झाला असेल पण गोवा स्वतंत्र होण्यासाठी 14 वर्ष लागले.
 
याचे कारण होते की, गोवा ब्रिटनच्या नाही तर पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. गोव्याला स्वतंत्रता मिळावी म्हणून राम मनोहर लोहिया सोबत डॉ. जुलियो मेनजेस यांनी देखील महत्वपूर्ण योगदान दिले.  
 
18 जून ला गोवा क्रांती दिवस साजरा केला जातो-
18 जून 1946 या दिवशी डॉ राम मनोहर लोहिया ने गोवा मधील जनतेला पोर्तुगीजांविरोधात मोर्चा काढण्यासाठी प्रेरित केले होते. त्यांच्या या कार्याने नंतर क्रांतीचे रूप घेतले. यानंतर देशाच्या तटीय परिसरात गोवा स्वतंत्र झाले पाहिजे म्हणून अनेक आंदोलन चाललेत. शेवटी 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून बाहेर काढण्यात आले आणि भारतामध्ये सहभागी झाले. 
 
भारतीय सेना ने गोव्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी पोर्तुगीजनांवर आक्रमण केले होते. यानंतर गोवा स्वतंत्र झाले पण पूर्ण राज्य बनण्यासाठी त्याला 26 वर्ष अजून लागले.गोवा स्वतंत्र झाल्यानंतर एक वर्षानंतर तिथे निवडणूक झाली आणि दयानंद भंडारकर गोवाचे पहिले निर्वाचित मुख्यमंत्री बनले. 30 मे 1987 ला गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आणि हे देशाचे 25 वे महत्वपूर्ण राज्य बनले.
 
गोवामध्ये 450 वर्षांपर्यंत पोर्तुगीजांनी शासन केले-
वर्ष 1510 मध्ये पोर्तुगीजांनी बीजापुर सुल्तान यूसुफ आदिल शाहला हरवून गोवा आपल्या ताब्यात घेतले होते. यानंतर 450 वर्षांपर्यंत गोवा मध्ये पोर्तुगीजांचे शासन होते. भारतीय सेना ने ऑपरेशन विजय अभियान अंतर्गत  9 डिसेंबर 1961 ला पोर्तुगीज असलेल्या ठिकाणी बॉंम्ब हल्ले केले होते.
 
याच्या दहा दिवसानंतर 19 डिसेंबर, 1961 ला तत्कालीन पुर्तगाली गवर्नर मैन्यू वासलो डे सिल्वा ने भारत समोर हत्यार टाकले आणि शरणागती पत्करली. दमण द्वीप मध्ये देखील त्यावेळेस गोव्याचा भाग होता, अश्याप्रकारे दमन द्वीप देखील गोव्याप्रमाणे स्वतंत्र झाले.  
 
Edited By- Dhanashri Naik