फर्निचरमध्ये सापडला 100 किलो सोन्याचा खजिना!
नातेवाइकांकडून बारसाने मिळालेल्या एका घराच्या फर्निचरमध्ये तब्बल शंभर किलो सोन्याचा खजिना सापडला आहे.
याबाबत माहिती देताना निकोलस फेयरफोर्ट म्हणाले की, ते या घराच्या नवीन मालकाने विक्री काढलेल्या जुन्या घरातील फर्निचरची अंदाजे किंमत काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी नवीन मालक फर्निचरला हलवत असताना त्यामध्ये सोन्याचे नाणे व बार आढळले. यामध्ये सोन्याचे पाच हजार नाणे तसेच बारा किलोच्यादोन बारचा समावेश आहे. थक्क करणारा हा खजिना अत्यंत गुप्तपने दडवलेला होता. तेथे प्राप्त दस्तावेजानुसार या सोन्याची खरेदी 1950 ते 1960च्या कालावधीत कायदेशीर झाली होती. एका स्थानिक दैनिकाने ही बातमी दिली.