1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (10:07 IST)

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे,
रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे,
समाजाचे ही आरोग्य सांभाळा जपून,
भान ठेवून वागा सगळे, मास्क वापरून,
अजून कित्ती सोसावी महामारी सगळ्यांनी,
उघडा न डोळे आता तरी, हीच विनवणी!
आरोग्यमंत्र अंमलात आणायला च हवा,
निरोगी आयुष्याचा हाच एकसूत्री मंत्र नवा,
करा जपणूक, करा सुरुवात, एकमुखाने,
रहा स्वस्थ, खा सकस, घ्या श्वास,हास्य वदने !
.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
अश्विनी थत्ते.