World Health Day : कोरोना संकट काळात जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

world health day
Last Modified मंगळवार, 6 एप्रिल 2021 (10:48 IST)
: 7 एप्रिल अर्थात जागतिक आरोग्य दिनावर संपूर्ण जग Coronavirus सारख्या प्राणघातक व्हायरसला लढा देत आहे. अशात जागतिक आरोग्य ‍दिनाचं महत्तव अजूनच वाढून जातं. जाणून घ्या या दिनाबद्दल संपूर्ण माहिती-
जागतिक आरोग्य दिन कधी सुरू झाला?
1950 साली World Health Day ची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना म्हणजे द्वारा करण्यात आली होती. या दिवशी WHO चा स्थापना दिन असतो, ज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. डब्ल्यूएचओ संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग आहे. जगातील आरोग्याच्या समस्येवर देखरेख ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे WHO चे मुख्य कार्य आहे.
​WHO कधी सुरू झाले?
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. तेव्हा WHO सोबत 61 देश जुळलेले होते. याची पहिली बैठक 24 जुलै 1948 रोजी झाली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात आहे. 1950 साली World Helath Day साजरा करण्याची सुरुवात झाली.

​जागतिक आरोग्य दिनाचे उद्दीष्ट काय आहे?
1950 पासून हा दिन साजरा करण्यामागील उद्दीष्ट जागतिक स्तरावर आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करणे आहे. केवळ चर्चा नव्हे तर आरोग्य सेवा आणि आरोग्याशी संबंधित अफवा किंवा गैरसमज देखील दूर करणे देखील आहे. WHO विविध देशांमधील सरकारांना आरोग्य धोरणे तयार आणि अंमलात आणण्यासाठी प्रेरित करतं.
​WHO चे उत्तम कार्य
आपल्या स्थापना काळापासून आतापर्यंत WHO ने स्मॉल पॉक्स सारखे आजार नष्ट केले आहे. भारत सरकारने देखील पोलिओसारख्या मोठ्या आजारावर विजय मिळविला आहे. या व्यतिरिक्त TB, HIV, AIDS आणि Ebola यासारखे जीवघेणे रोग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्नही केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी अनेक देश डब्ल्यूएचओ बरोबर काम करत आहेत.

WHO चं उद्देश
WHO चं उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्याप्रती जागरूक करणे आहे. या ‍दिनानिमित्त आपण प्रण केला पाहिजे की आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्याल. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, उपचार, निरोगी जीवनशैली, योग्य ज्ञान प्राप्ती, आणि जागरुक राहणे हे सर्व महत्त्वाचे आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू
नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. अशी ...

कोरोनाचा थैमान, 3 लाख नवीन प्रकरणे, या 8 राज्यांमध्ये ...

कोरोनाचा थैमान, 3 लाख नवीन प्रकरणे, या 8 राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू
देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे सुमारे तीन लाख नवीन प्रकरणे समोर आल्याने एकूण संक्रमित ...

रामनवमी : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या ...

रामनवमी : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद का?
हनुमान या हिंदू देवतेचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानने ...

कोरोनाचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे व्हेरियंट कसे आढळत आहेत?

कोरोनाचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे व्हेरियंट कसे आढळत आहेत?
भारतात 2020 च्या अखेरीस कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणजेच नवा प्रकार आढळला, जो त्याआधी ...

कोरोना संसर्गाची सगळी लक्षणं दिसत असूनही अनेकांमध्ये टेस्ट ...

कोरोना संसर्गाची सगळी लक्षणं दिसत असूनही अनेकांमध्ये टेस्ट निगेटिव्ह का येते?
कोरोना संसर्गाची प्रमुख लक्षणं म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, खूप थकवा आणि जुलाब ...