शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (12:30 IST)

आरे आरेच्चा...

आरे हा विषय दोन्ही बाजूचे लोक अक्षरशः वाईट अँगल देत आहेत. आरे मधीक वृक्षतोडीला विरोध करणारे अशा थाटात विरोध करत आहेत जणू ह्यांची लाईफस्टाईल पर्यावरणपूक आहे. हे लोक मला खूप क्युट वाटले. (अर्थात अनेक लोक मनापासूनही बोलत होते, सगळेच काही मुद्दामून करतात असं नाही) त्यातल्या अनेकांना मी पर्सनली ओळखतो, ते पर्यावरणपूरक तर नाहीच पण त्यांची लाईफस्टाईल पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणजे तुम्ही साधी पाण्याची बॉटल विकत घेतली की तुम्ही किती नुकसान करता? पाणी ज्याची किंमत (पैशाने) तेवढी नसते, पण आपण विकत घेतो. आणि मिनरल वॉटर बनवणाऱ्या कंपनीमुळे पाण्याच्या समस्यां निर्माण होत आहेत, बर प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होत ते वेगळं.
 
एसी शिवाय जगू न शकणारे लोकही असा आव आणत आहेत जणू ते पर्यावरणवादी आहेत. विरोध करणारे काही लोक तर नियमित हॉटेलिंग करणारे आहेत (त्यांच्या पैशाने ते करतात, मला प्रॉब्लेम नाही). पण हॉटेल्समध्ये टिश्यू पेपर वापरतात. त्याचा ते वापर करतात. दुसरी गोष्ट म्हणजे काही मित्र तर रस्त्यावर कचरा टाकणारेही आहेत. काही लोक सतत रिक्षा किंवा कारचा वापर करणारे आहेत. म्हणजे जिथे तुम्ही ट्रेनने आणि बसने जाऊ शकता, तिथे कार, रिक्षाने जाऊन ट्राफिक आणि प्रदूषणाला आमंत्रण का द्यायचं? असे अनेक मुद्दे आहेत. ते या गोष्टी करतात म्हणून ते वाईट आहेत असं मला मुळीच म्हणायचं नाही. ते अस करतात म्हणून त्यांना पर्यावरणावर बोलायचा अधिकार नाही असही मला म्हणायचं नाही. पण हे लोक जो आव आणताईत की आम्ही पर्यावरणाचे रक्षक अहोत आणि सरकारची बाजू घेणारे भक्षक आहेत. हा आव चुकीचा आहे. यात अजून गंमत म्हणजे काही लोक असेही आहेत जे केवळ भाजपच्या सरकारला विरोध करण्यासाठी करतात हे त्यांच्या म्हणण्यावरून स्पष्ट दिसतं. कारण लवासा असो किंवा अजून कोणताही प्रोजेक्ट त्याला ह्यांनी विरोध केला नव्हता. पण हा मुद्दाही आपण सोडून देऊ.
 
पण आपण स्वतः काहीतरी निसर्गासाठी करणे गरजेचे असते की नाही? लोकासांगे ब्रह्मज्ञान हे किती दिवस चालणार? आणि तुम्ही पर्यावरणवादी आहात तर तसे वागायला नको का? केवळ कारशेडला विरोध करून तुम्ही पर्यवरणवादी होणार आहात का? पर्यावणारणाचे नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही काही विशेष काळजी घेतली आहे का? तर यापैकी कुणी अस काही केल्याची शक्यता नाही. सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली की ह्याच लोकांनी त्या निर्णयाला विरोध केल्याच मला आठवतय. कुणाची नाव सांगण्याची गरज नाही. ती त्यांची बदनामी किंवा त्याना ट्रोल केल्यासारख होईल. इथे लॉजिक असा लावला जातोय की जे आरे करशेडला सपोर्ट करतात ते भक्त वगैरे वगैरे... ते ही आपण मानू. पण त्या लोकांनी पर्यावरणासाठी काय केलंय? आरे कारशेडला विरोध करण्याऐवजी काही विशेष केलय का? विशेष म्हणजे भव्य दिव्य नव्हे. मी आठवड्यातून एकदा वा दोनदाच बाईक वापरेन, जास्त करून ट्रेन बसनेच प्रवास करेन, कमी सिगरेट ओढेन, विकत कोल्डड्रिंक्स किंवा पाणी घेणे शक्यतो टाळीन. शक्यतो एसी लावणार नाही. अशा अगदी साध्या गोष्टी.
 
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण माणसं पर्यावरणवादी नाही. त्यातल्या त्यात पर्यावरणाची हानी होऊ नये एवढंच आपल्याला पाहायचंय. म्हणून उगाच कुणी आव आणण्याचा प्रयत्न करू नये. खोटं वागू नये इतकं साधं म्हणणं आहे. मुंबईतली समस्यां अशी आहे की इथे सरासरी एक कुटुंब 350 चौ, फु च्या खोलीत राहतो. 10 बाय 10 च्या खोलीत राहणारे निराळे. अगदी ढोबळ मनाने सांगायचं झालं तर मुंबईतला मध्यमवर्गीय प्रत्येक माणूस सरासरी 20 फुटाच्या जागेत राहतो. ही आपली लायकी आहे. माझं गणित चूकलही असेल.
वृक्षतोड होऊ नये हे सांगायला पर्यावरण तज्ज्ञांची आवश्यकता नाही. झाड कोणाला आवडत नाही? मी लहानपणी बँगलोरमध्ये राहत असताना आमच्या घरासमोर काही रोपे लावली होती. मी बऱ्याचदा पाणी घालायचो. मला खूप आवडायचे ते. लहानपणी सांगितलं जायचं की झाडांना भावना असतात, तेही आपल्याशी बोलतात. म्हणून मला त्यांच्याशी बोलायला आवडायचं. थोडं पुढे चिंचेचं झाड होतं. आई तिथे जायला मना करायची. कारण चिंचेच्या झाडावर भूत असतं म्हणे. पण मला ते झाड आवडायचं. कदाचित, भूतालाच भुताच आकर्षण... झाडांविषयी लहानपणी अनेकांच्या अशा आठवणी असतील...
 
पण आरे हा विषय पर्यावरणाचा राहिला नाही. तो देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नरेंद्र मोदींना शिव्या घालण्याचा झालेला आहे. त्यांना शिव्या घालायलाही हरकत नाही. लोकशाही आहे. पण लोकांना संशय येईल की तुमचं झाडांवर प्रेम नसून सरकारवर रोष आहे असं दिसेल असं तरी वागू नका. रोष असण्यालाही हरकत नाही. लोकशाही आहे. दिवसरात्र शिव्या घाला. पण तुमचं झाडांवर खरोखर प्रेम असेल तर प्लिज वैयक्तिक आयुषयात कमीत कमी पर्यावरणाचं नुकसान करा. एसी, कार, बाईक, टिश्यू पेपर, पाणी व कोल्ड्रिंग (प्लॅस्टिकमधून मिळणारे) ह्यांचा कमी वापर करा. ट्रेन आणि बसचा जास्तीत जास्त वापर करा. फक्त आरे कारशेडला विरोध करण्यापूरत आपलं पर्यावरण प्रेम मर्यादित ठेवू नका. प्लिज हा...
 
लेखक:  जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#jayeshmestry