मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 9 डिसेंबर 2025 (14:45 IST)

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या

motivational thoughts
जर आपण  'राग' विकत घेतला, 
तर आपल्याला 'ॲसिडिटी' फुकट मिळते.
 
जर आपण 'ईर्ष्या' विकत घेतली, 
तर आपल्याला 'डोकेदुखी' फुकट मिळते.
 
जर आपण 'द्वेष' विकत घेतला, 
तर आपल्याला 'अल्सर' फुकट मिळतो.
 
जर आपण  'ताणतणाव' विकत घेतला,
तर आपल्याला 'रक्तदाब (BP)' फुकट मिळतो.
 
जर आपण 'विश्वास' विकत घेतला, 
तर आपल्याला 'मैत्री' फुकट मिळते.
 
जर आपण 'व्यायाम' विकत घेतला,
तर आपल्याला 'निरोगी आयुष्य' फुकट मिळते.
 
जर आपण 'शांती' विकत घेतली, 
तर आपल्याला 'समृद्धी' फुकट मिळते.
 
जर आपण 'प्रामाणिकपणा' विकत घेतला, 
तर आपल्याला  'झोप' फुकट मिळते.
 
आता हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की, 
आपण काय विकत घेतलं पाहिजे....
ते आपणचं ठरवायचं आहे.
 
फक्त एकदा विचार करून बघा…
 
1. टायर चालताना घासले जातात, पण पायाचे तळवे आयुष्यभर धावत राहूनही नवीनच राहतात.
2. शरीर ७५% पाण्याने बनलेले आहे, तरीही लाखो रोमछिद्र असूनसुद्धा एक थेंबही गळत नाही.
3. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण हे शरीर स्वतःचा तोल राखते.
4. कोणतीही बॅटरी चार्जिंगशिवाय चालत नाही, पण हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड धडकत राहते.
5. कोणताही पंप कायम चालू राहू शकत नाही, पण रक्त आयुष्यभर अखंड शरीरभर वाहत राहते.
6. जगातील सर्वात महागडे कॅमेरेही मर्यादित आहेत, पण डोळे हजारो मेगापिक्सेल गुणवत्तेत प्रत्येक दृश्य टिपू शकतात.
7. कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवी तपासू शकत नाही, पण जीभ कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवी ओळखू शकते.
8. सर्वात प्रगत सेन्सरही मर्यादित असतात, पण त्वचा अगदी हलकीशी संवेदना देखील जाणवू शकते.
9. कोणतेही यंत्र सर्व आवाज निर्माण करू शकत नाही, पण कंठातून हजारो फ्रिक्वेन्सीचे स्वर निर्माण होऊ शकतात.
10. कोणतेही उपकरण सर्व आवाजांचे पूर्ण अर्थ लावू शकत नाही, पण कान प्रत्येक आवाज ओळखून त्याचा अर्थ समजतात.
 
ईश्वराने आपल्याला दिलेल्या या अमूल्य देणग्यांसाठी त्याचे आभार माना — आणि त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही… 
 
-साभार सोशल मीडिया