बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (10:11 IST)

International Mother Language Day का साजरा केला जातो हा दिन, जाणून घ्या

देशात आणि जगात आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस (International Mother Language Day) भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभरातील लोक वापरत असलेल्या सर्व भाषांच्या जतन आणि संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे.
 
याची कल्पना प्रथम बांगलादेशातून आली
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम बांगलादेशातून आली. 2000 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या जनरल कॉन्फरन्सने 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी UNESCO द्वारे एक अनोखी थीम निवडली जाते.
 
बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही थीम आहे
2022 ची थीम 'बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर, आव्हाने आणि संधी' आहे. हे बहुभाषिक शिक्षणाच्या प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाच्या संभाव्य भूमिकेवर लक्ष केंद्रित करते आणि सर्वांसाठी दर्जेदार अध्यापन आणि शिक्षण विकसित करण्यात मदत करते. हा दिवस साजरा करण्यासाठी, सांस्कृतिक मंत्रालय इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) आणि UNESCO नवी दिल्ली क्लस्टर ऑफिस यांच्या सहकार्याने भौतिक आणि आभासी स्वरूपात दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करत आहे.