बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (11:40 IST)

Jagtik adivasi Day 2024: जागतिक आदिवासी दिन

Jagtik adivasi
Jagtik adivasi Day आज 9 ऑगस्ट हा दिवस जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात.या दिवसी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा घालतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला. तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले. मग दमदमान त्यांचे शब्द, भाषाआणि संवाद अश्या प्रकारे त्यांची उत्क्रांती होत गेली, आजही जगात वेगळया वेगळया  भागात अनेक आदिवासी जमाती त्यांची बोलीभाषा, रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगतात.आधुनिक दुनियेच्या झगमगटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत.
 
खूप वर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली,ती बाब म्हणजे अनेक जगातील मूळ राहणाऱ्या समूहाने निसर्ग जपण्यासाठी महत्वाचे कार्य केले. पण हि लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे ह्या आदिवासी जमाती शिक्षणा पासून, आरोग्य, रोजगार व अनेक सोईसुविधा पासून वंचित राहिले आहेत. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 9ऑगस्ट1994 या दिवश जागतीक आदिवासी दिवस म्हणून
Jagtik adivasi

घोषित केला(International Day of Indigenous People)
या दिवसा पासून सर्व जगभरात आदिवासी बांधवांना त्यांक्या मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळण्यासाठी जागतीक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले.पण भारतामध्ये मात्र 1950 पासूनच संविधानानुसार आदिवासी लोकांच्या विकासाची भूमिका समोर ठेऊन तरतूद करण्यात आली होती सर्वात जास्त अनुच्छेद सविधनामध्ये आदिवासी बांधवांच्या हित रक्षणाचे आहेत. आदिवासी लोकांचे एक स्वतंत्र जीवनशैली, त्यांच्या रुढी, प्रथा आणि परंपरा आणि सामाजिक कायदे सुद्धा आहेत. 
 
अनेक ठिकाणी स्वशासनावर होती आधारित वटिभ शीव समाजव्यवस्था जंगलावरील त्यांचा हक्क हिरावला गेला व त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेवर याचा प्रतिकूल परिणाम झाला.या गोष्टी मुळे त्याना विविद्धा समस्येला तोंड द्यावे लागत होते. सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा हा कायदा अस्तित्वात आला आहे,त्या कायद्याचे प्रमुख सूत्र म्हणजे आदिवासी लोकांची संस्कृती, प्रथा आणि परंपरा याचे रक्षण करणे आणि संवर्धन करणे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी लोकांची शासन वेवस्ता बळकट करणे हे आहे.