गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (09:36 IST)

असे होते लाल बहादूर लाल बहादूर शास्त्री

Lal Bahadur Shastri
यांचा लहानपणीचे नाव 'नन्हे' होते. त्यांना गावाच्या बाळ-गोपाळांसह नदीमध्ये पोहायला फार आवडायचे. ते आपल्या मित्रांसह गंगा नदीमध्ये पोहायला जात असे. लहानपणी त्यांनी आपल्या एका मित्राला नदीमध्ये बुडण्यापासून वाचवलं होतं. 
 
काशीच्या रामनगर येथे वडिलोपार्जित घरापासून ते दररोज आपल्या डोक्यावर दप्तर आणि कापड ठेवून बरेच किलोमीटर अशी लांब गंगेला पार करून शाळेत जात होते. हरिश्चंद्र इंटर कॉलेजात अभ्यासासाठी उशिरा पोहोचायचे. वर्ग मास्तर त्यांना वर्गाच्या बाहेर उभे करून ठेवायचे, तिथेच उभारून ते आपलं सर्वअभ्यास काम करीत असे. मोठे झाल्यावर ते भारताचे दुसरे पंत प्रधान झाले.