शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By ©ऋचा दीपक कर्पे|
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (13:36 IST)

अलक

नवीन घरात अर्धवट लाकडी देवघर बघून त्याचा चेहरा पडला, त्याला गणपतीची स्थापना नवीन देवघरात करायची होती.
 
इकडे तिने पटकन "अरे वा! एवढं तर तयार झालं" म्हणत जरीच्या साड्यांनी गणरायाच्या स्थापनेसाठी देखावा मांडायला सुरुवात केली.
 
पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा हे जो तो ज्याचे त्याचे ठरवतो!