शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By

Buddha Jayanti 2023 गौतम बुद्ध यांचे 10 सुंदर विचार

गौतम बुद्धांच्या उपदेशांमध्ये त्यांनी सांगितले आहे की आपण आपल्या जीवनात सुख आणि यश कशे मिळवू शकतो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धांचा जन्म वैशाखातील पौर्णिमेला झाला होता. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून म्हणतात. बुद्धांना बोध वृक्षांखाली ज्ञान प्राप्ती झाली. 
 
भगवन बुद्ध यांचा जन्म कपिलवस्तूजवळ लुम्बिनी स्थळी झाले असे. यांच्या लहानपणीचे नावं सिद्धार्थ असे. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी आपले घर सोडून संन्यास घेतले. ह्यांना ज्या स्थळी ज्ञान प्राप्ती झाली त्या स्थानाला बोधगया असे म्हटले गेले. 
 
ह्यांनी आपले सर्वात पहिले उपदेश सारनाथ येथे दिले आणि बौद्ध धर्म स्थपित केले. बुद्धांनी 4 आर्य सत्याचे ज्ञान दिले. वैशाख पौर्णिमेला बोधगया येथे ह्यांना बोधी वृक्षाच्या खाली ज्ञान प्राप्ती झाल्याने या दिनाला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. 
 
या दिवशी या धर्माचे लोकं आपल्या घरात दिवे लावतात. बौद्ध धर्माचे ग्रंथांचे पठण केलं जातं. चांगली कामं केली जातात, पशू आणि प्राण्यांना मोकळे सोडतात, गरजूंना अन्न, वस्त्र दान दिले जातं. 
 
बुद्धांचे 10 मौल्यवान विचार
1 संशय करण्याची सवय चांगली नसते. संशय नात्यांमध्ये दुरावा आणतो. संशय नवरा बायकोच्या नात्यामध्ये, दोन जिवलग मित्रांच्या नात्यामध्ये तसेच दोन प्रेम करणाऱ्यांचा नात्यामध्ये दुरावा आणतो. या वाईट सवयी पासून नेहमीच लांब राहायला हवे. 
 
2 आपण एखाद्या गोष्टीवर चिडतो. त्याचा रागराग करतो. राग मनामध्ये ठेवल्यास सत्याचा मार्ग सोडून वाईट मार्गाकडे वळतो आणि स्वार्थी बनतो. त्यामुळे स्वतःचे खरे करू लागतो. या साठी राग करणे टाळावे. 
 
3 कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. 
 
4 अज्ञानी माणूस बैलाकार असतो. फक्त आकारानेच मोठा असतो पण मनाने खूप लहान असतो. 
 
5 राग मनात ठेवणे म्हणजे जळत्या कोळसा आपल्या हाती धरून कोणावर टाकणे. असे केल्याने आपलेच हात भाजतात, ह्याची जाणीव राग मनात ठेवणाऱ्याला ठाऊकच नसते. 
 
6 ज्या प्रकारे या संसारात आनंद आणि सुख जास्त काळ टिकून राहत नाही त्याच प्रमाणे दुःख पण जास्त काळ राहत नसतं. आपण दुःख रुपी अंधारात आहात आणि वाईट काळ आपल्याला भोगावे लागत असल्यास आपल्याला चांगले विचार ठेवले पाहिजे. त्यामधून मार्ग शोधले पाहिजे. 
 
7 आपण वाईट काळात गुंतायला नको. भविष्याचा अतिविचार करायला नको. आपले मन आणि कर्म वर्तमानामध्येच गुंतवायला हवे. त्या प्रमाणे कृती करावी. 
 
8 आयुष्यात ध्यान करून ज्ञान मिळविण्यापेक्षा शहाणपणाने वागणे कधीही चांगले.
 
9 आपला राग आपण कोणाला दंडित करण्यासाठी नव्हे तर आपल्यालाच त्याची शिक्षा भोगावी लागते. 
 
10 आपल्या खाण्या पिण्याच्या दिनचर्येला नियमाने ठेवायला हवे. प्रत्येक मनुष्याच्या हाती आपले आरोग्य चांगले ठेवणे असतं. आपल्या खाण्यापिण्याचा सवयी चांगल्या ठेवाव्या.