रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By

Buddha Purnima 2023 Date बुद्ध पौर्णिमा 2023 कधी आहे, पूजा विधी आणि उपाय

gautam buddha
Buddha Purnima 2023 या वर्षी 2023 मध्ये बुद्ध पौर्णिमा शुक्रवार, 5 मे रोजी साजरी केली जात आहे. दरवर्षी वैशाख महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा म्हणतात. सिद्धार्थ गौतम अर्थात भगवान गौतम बुद्ध यांचे जीवन तत्वज्ञान आजही प्रासंगिक आहे. हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस देखील आहे. भगवान बुद्धांना या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली.
 
हजारो वर्षांनंतर आजही सत्य, अहिंसा, दया, करुणा, शांती आणि मैत्री या मानवी मूल्यांवर आधारित गौतम बुद्ध आपल्या सर्वांच्या हृदयात राहतात.
 
बुद्ध पौर्णिमा पूजा वेळ
पौर्णिमा तिथी प्रारंभ: 4 मे रोजी रात्री 11:43 मिनिटापासून
पौर्णिमा तिथी समाप्त: 5 मे रोजी रात्री 11.03 मिनिटापर्यंत
 
चला जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेला पूजा कशी करावी, सोप्या पद्धती आणि उपाय...

बुद्ध पौर्णिमा पूजा विधी
हिंदू मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूंचे नववे अवतार आहे. हिंदूंसाठी देखील हा दिवस महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. या दिवशी घरात दिवे लावले जातात, दान-पुण्य केलं जातं. मिठाई, सत्तू, जलपात्र, वस्त्र दान करुन पितरांना तर्पण केल्याने पुण्य प्राप्ती होते असे म्हणतात.
 
- बुद्ध जयंती किंवा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीत स्नान करावे.
 
- नदीत स्नान केल्यानंतर हातात तीळ ठेऊन पितरांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
 
- नदी स्नान शक्य नसल्यास बादलीभर पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे.
 
- नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्या.
 
- आता नियमानुसार भगवान श्री विष्णूंची पूजा करावी.
 
- भगवान विष्णूसमोर तूप, तीळ आणि साखरेने भरलेले भांडे ठेवावे.
 
- दिवा लावताना त्यात तिळाचे तेल टाकून दिवा लावावा.
 
- आरती करावी.
 
- या दिवशी बोधीवृक्षाच्या फांदीवर दूध आणि सुगंधित पाणी घालून दिवा लावा.
 
- पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांना मुक्त करावे.
 
- बौद्ध स्थळांना भेट देऊन प्रार्थना करावी.
 
- बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मग्रंथांचे पठण करावे.
 
- आपल्या कुवतीनुसार गरिबांना धर्मादाय साहित्य वाटप करावे.
 
- रात्री चंद्राची फुले, धूप, दिवा, खीर इत्यादींनी पूजा करावी.
 
बुद्ध पौर्णिमा उपाय
 
1. या शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात.
 
2. गौतम बुद्ध प्राण्यांच्या हिंसेच्या विरोधात होते, त्यामुळे या दिवशी मांसाहार करू नका आणि खाऊ देऊ नका.
 
3. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना वस्त्र आणि अन्न दान केल्याने गोदान केल्यासारखेच फळ मिळते.
 
4. तीर्थक्षेत्री जाऊन नदीत स्नान करा आणि तळहातात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून पितरांना अर्पण करा.
 
5. बुद्ध भगवान विष्णूचा नववा अवतार मानले जातात म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
 
6. पुण्य प्राप्तीसाठी बुद्ध पौर्णिमेला सत्तू, मिठाई, जल पात्र, अन्न, भोजन आणि वस्त्र दान करावे। 
 
7. या दिवशी तीळ आणि मध दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.
 
Disclaimer : धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासंबंधीचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.