रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शनिवार, 11 डिसेंबर 2021 (11:05 IST)

माऊंटन डे : विशाल आपुली पर्वतराजी, उभी दिमाखात

विशाल आपुली पर्वतराजी, उभी दिमाखात ,
जीवन आपले सुरक्षीत, हिमालयाच्या सावलीत,
सैह्याद्री खुणवते सकला, यावे गिर्यारोहणा,
तोलून धरला त्याने भरभक्कम, महाराष्ट्रा चा बाणा,
छोट्या छोट्या पर्वतरांगा,आहे चहू दिशेला,
चहा च्या बागा ही सजती, त्या पश्चिमेला,
वनसृष्टी अमाप सजली या पर्वतावर,
वनाऔषधी चा खजिनाच जणू ह्याच्या अंगावर,
महत्व पर्वताचे अमुल्य आहे मानवजातीला,
म्हणून च खरे महत्व आलं या धरतीला!
...अश्विनी थत्ते