सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (09:53 IST)

महादेवांच्या या तीन मुलींबद्दल माहित आहे का... शिवच्या 3 दिव्य कन्या

फारच कमी लोकांना ज्ञात असेल की शिवला प्रत्यक्षात 6 मुले आहेत. त्यांना तीन मुले असून त्यांना 3 मुलीही आहेत. त्याचे वर्णन शिव पुराणात सापडते.
 
शिवच्या तीन कन्या आहते आणि त्यांचे नाव- अशोक सुंदरी, ज्योति किंवा ज्वालामुखी देवी आणि देवी वासुकी किंवा मनसा असे आहेत. तिघी बहिणी आपल्या भावांप्रमाणे फार लोकप्रिय नाही तरी देशातील काही भागांमध्ये त्यांची पूजा केली जाते. यापैकी शिवची तिसरी कन्या म्हणजे वासुकी यांना पार्वती देवीची सावत्र कन्या मानलं जातं. मान्‍यता आहे की कार्तिकेय प्रमाणेच वासुकीला  पार्वतीने जन्म दिला नव्हता.
 
1. अशोक सुंदरी
महादेवांची मोठी मुलगी अशोक सुंदरी यांना देवी पार्वतीने आपलं एकाकीपणा दूर करण्यासाठी जन्म दिला होता. त्यांना मुलगी हवी होती. देवी पार्वती यांच्यासारखीच अशोक सुंदरी अत्यंत रुपवती होत्या. म्हणूनच त्यांच्या नावात सुंदरी असं आहे. त्याचवेळी अशोक नावात सामील होण्यामागील कारण त्या पार्वतीच्या एकाकीपणाचे दु: ख दूर करण्यासाठी आल्या होत्या. अशोक सुंदरी यांची पूजा विशेष करुन गुजरात राज्यात होते.
 
अशोक सुंदरीबद्दल असेही म्हटले आहे की जेव्हा भगवान शिवने गणरायाचे शिरच्छेद केले होते तेव्हा त्या घाबरुन मिठाच्या पोत्यात लपून बसल्या होत्या. यामुळे, त्यांना मिठाच्या महत्वाशी संबंधित असल्याचे देखील म्हणतात.
 
2. ज्योति
शिवच्या दुसर्‍या मुलीचं नाव ज्योती असे आहे आणि त्यांच्या जन्माविषयी दोन कथा प्रचलित आहे. एका कथेनुसार ज्योति यांचा जन्म शिवाच्या तेजस्व रुपामुळे झाला होता आणि त्या शिवाच्या प्रभामंडळाचे स्वरुप आहे. दुसर्‍या एका समजुतीनुसार ज्योतीचा जन्म पार्वतीच्या कपाळावरुन निघणार्‍या तेजपासून झाला. ज्वालामुखी हे देवी ज्योतीचे आणखी एक नाव आहे आणि त्यांची पूजा तामिळनाडूमधील अनेक मंदिरांमध्ये केली जाते.
 
3.मनसा
शिवच्या या कन्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, या देवीला खूप राग येतो ..
 
बंगालच्या लोककथांनुसार सर्पदंश करण्याचे उपचार मनसा देवी करतात. त्यांचा जन्म तेव्हा झाला होता, जेव्हा शिवांचे वीर्य कद्रू, ज्यांना सापांची आई म्हणतात, च्या प्रतिमेला स्पर्श झाला होता. म्हणून त्यांना शिव पुत्री म्हणतात परंतु पार्वतीची नव्हे. म्हणजेच कार्तिकेयांसारख्या पार्वतीच्या गर्भाशयातून मनसा जन्माला आल्या नाही.
 
असे म्हटले जाते की मनसाचे नावही वासुकी असे आहे आणि तिचे वडील, सावत्र आई आणि नवर्‍याद्वारे उपेक्षित असल्यामुळे त्या स्वभावाने खूप रागीट आहे. सामान्यत: कोणत्याही मूर्ती वा चित्राशिवाय त्याची पूजा केली जाते. त्याजागी झाडाची फांदी, मातीची भांडी किंवा मातीचा साप बनवून त्याची पूजा केली जाते. चिकन पॉक्स किंवा सर्पदंशापासून वाचण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. बंगालच्या अनेक मंदिरात त्यांची विधिवत पूजा केली जाते.
 
जरी अनेकांना शिव कन्यांबद्दल माहिती नसली तरी पुराणात त्यांचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आढळतो.