गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करू नका

तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते? काळजी करू नका. अनेकांना अधिक वेळ ऑफिसमध्ये राहिल्याने झोप येतेच. मात्र अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे.
 
ऑफिससाठी एक खास स्पेस सेव्हिंग डेस्क बनवण्यात आले आहे, जिथे तुम्हाला आराम करता येईल.
 
ग्रीक आर्किटेक्टने एक असं डिझाईन केलंय की, जिथे डेस्क बेडमध्ये रूपांतरित करणं शक्य होणार आहे. नाइट शिफ्ट करणार्‍यांना डोळ्यांसमोर ठेवून या बेडचं डिझाईन करण्यात आलंय. ऑफिसमध्ये असताना अनेकदा असं होतं की, झोप येत असते, मात्र झोपण्यासाठी जागा नसते.
खुर्ची कितीही आरामदायी असली तरी निवांत झोप घेता येईल अशी तिची रचना नसते. अशावेळी ग्रीक आर्किटेक्टने तयार केलेलं हे बेड नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. अनेकांना ऑफिसमध्ये डेडलाईनवर काम करावं लागतं. मग नेहमीच्या शिफ्टमध्ये काम पूर्ण न झाल्यास अधिकचा वेळ ऑफिस मध्येच थांबून काम पूर्ण केलं जातं.
 
अशावेळी थकवा जाणवू लागल्यास ऑफिसमध्ये आराम करण्यासाठी अशाप्रकारचा डेस्क-कम-बेड वापरू शकता.