मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (13:29 IST)

राष्ट्रीय सेल्फी दिवस

World Selfie Day 2024: सेल्फी स्वतःला आनंदित ठेवण्याचा एक गमतीदार भाग आहे. पण याचा उपयोग समजूतदार पणे करावा. आपण लक्षात ठेवायला हवे की, सेल्फी केवळ फोटोच नाही तर, आपले व्यक्तिमत्व आणि आपली विचारधारा दाखवते. चला जाणून घेऊ या सेल्फीचा 185 वर्ष जुना इतिहास.
 
आजकाल सेल्फीचा क्रेज प्रत्येकाच्या डोक्यावर चढला आज. तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण स्मार्टफोन च्या कॅमेरामधून फोटो काढून सोशल मीडिया वर शेयर करतात. सेल्फी केवळ फोटो काढण्याच्या मर्यादेत राहिली नाही तर, ही सेल्फ-एक्सप्रेशन आणि सेल्फ-लव चा महत्वाचा भाग बनली आहे. लोक आपली सर्वात सुंदर सेल्फी घेण्यासाठी नवीन नवीन पोज आणि एंगल वापरतात. सेल्फीचा हा क्रेज एवढा वाढला आहे की, प्रत्येक वर्षी 21 जूनला वर्ल्ड सेल्फी डे साजरा करण्यात येतो.
 
पण तुम्हाला माहित आहे का? सर्वात पहिला सेल्फी कोणी घेतला होता? लोकांना असे वाटते की सेल्फीची सुरवात तेव्हा झाली जेव्हा स्मार्टफोन आलेत. पण सेल्फीचा इतिहास खूप जुना आहे.
 
सेल्फीचे चलन 19 व्या शतकात सुरु झाले होते, पण 21व्या शतकामध्ये स्मार्टफोनच्या एंट्री सोबत हे गतीने लोकप्रिय झाले. आज सेल्फी जगभरामध्ये लोकांनी स्वतःला आनंदित ठेवणे आणि आपल्या आठवणी सांभाळून ठेवणे शेयर करण्याचे एक लोकप्रिय साधन बनले आहे.

Edited By- Dhanashri Naik