testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जगातील पहिला संस्कृत इंटेरनेट रेड़िओची सुरवात

first sanskrit radio
Last Modified शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (11:57 IST)
संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, खांडबहाले.कॉम निर्मित जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटेरनेट-रेड़िओ जागतिक-संस्कृत-दिनी अॉनलाईन प्रसारित करण्यात आला.
'श्रवण' हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपद्धति, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळुहळू ती भाषा आपसुकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते परंतु सोयिनुसार व पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही असे लक्षात आल्यावर नाशिकस्थित खांडबहाले॰कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, २४ तास व सातहि दिवस (२४x७) अव्याहतपणे सुरु राहिल असा 'संस्कृत-इंटेरनेट-रेड़िओ' 'जागतिक-संस्कृत-दिना'च्या औचित्याने संस्कृतप्रेमींसाठी आज अॉनलाईन प्रसारित केला.
याविषयी संस्थेचे संचालक सुनील खांडबहाले यांनी सांगीतले कि, मी संस्कृतभारतीचा विद्यार्थी आहे. संस्कृत भाषेचे अध्ययन करत असताना संस्कृत भाषा कानावर पड़त होती परंतु एकदा वर्गाबहेर पडले की संस्कृत-श्रवण दुर्मिळ होते. संस्कृत स्तोत्र, श्लोक, गीतं अनेक वेबसाइट्स वर अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु व्यवहारिक जीवनाशी सबंध सांगता येईल असे संवदात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन-संकलित करणे आणि २४ तास अव्याहत श्रवण करता येऊ शकेल इतके सुसहय करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे खरं तर स्वतःसाठी संस्कृत-संभाषण शिकण्याचे साधन म्हणुन मी इंटरनेट रेड़िओ डिज़ाइन केला. पुढे अनेकांच्या अग्रहास्तव आणि सहभगातून संस्कृत इंटेरनेट रेड़िओला मूर्त रूप देणयात आले.
यामध्ये विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषणं (जसे शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य संवाद, मित्र-संवाद, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग-संवाद), विषयवार धड़े, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तु-संबंध, लघुकथा-बोधकथा, गीतं, कविता, सुभाषितं असा मनोरंजनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. जगभरातिल व्यापक लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा इंटेरनेटवर हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. www.khandbahale.com/sanskrit किंवा https://tinyurl.com/sanskritradio या संकेतस्थळावर संस्कृत रेड़िओ ऐकण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा अॅप डाउनलोड किंवा इंस्टाॅल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता-करता स्मार्टफ़ोन, टॅबलेट तसेच संगणकावर संस्कृत इंटेरनेट रेड़िओ श्रवणाची सुविधा असल्याने श्रोत्यांसाठी अधिक सोयीचे आहे. नजिकच्या काळात सर्वसमावेशक व दर्ज़ेदार कार्यक्रम निर्मितिसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी आपले योगदान देऊ शकतील व अभिव्यक्त होऊ शकतील अशी योजना असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगीतले. त्यासाठी विषयतज्ञ आणि संस्कृतप्रेमींच्या सूचना प्रार्थनिय असल्याचे त्यांनी आवाहन केले.


यावर अधिक वाचा :

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?
देशातील देशातील जेषत जेष्ठ नेते नेते आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ...

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन
मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम जी डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या ...

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश ...

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे
येथिल मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ...

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..
सोशल मीडियावर एक विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे ज्यात कपलने लिहिले आहे की ...

नरेंद्र मोदींचं 500 रुपयांचं उपरणं 11 कोटी रुपयांना विकलं ...

नरेंद्र मोदींचं 500 रुपयांचं उपरणं 11 कोटी रुपयांना विकलं गेलं? - बीबीसी फॅक्ट चेक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव झाला. लिलावात मोदींच्या ...

पुणेकरांनो लक्ष द्या गुरुवारी पाणी बंद तर शुक्रवारी कमी ...

पुणेकरांनो लक्ष द्या गुरुवारी पाणी बंद तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी
पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र, ...

मी ज्या दिशेने जातो तिकडचं पारडं जड, माझा भाजप प्रवेश ...

मी ज्या दिशेने जातो तिकडचं पारडं जड, माझा भाजप प्रवेश निश्चित: राणे
शिवसेना-भाजपमध्ये होवो अथवा नाही, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असं वक्तव्य ...

जेलवारी करणाऱ्यांनी सांगू नये की पवारांनी काय केले; शरद ...

जेलवारी करणाऱ्यांनी सांगू नये की पवारांनी काय केले; शरद पवारांचा अमित शहाना टोला
‘मी आता घरच्यांना सांगितलंय की तुम्ही आता तुमचे बघा. मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर ...

मोदींना राष्टपिता म्हटल्याने मिसेस सीएम झाल्या टीकेच्या धनी

मोदींना राष्टपिता म्हटल्याने मिसेस सीएम झाल्या टीकेच्या धनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात अडकल्या, अमृता ...