सरकारकडून ऑनलाइन स्पर्धा, जिंका मोठी बक्षिसे
मोदी सरकारने घर बसल्या 25 हजार रुपये जिंकण्याची खास उपलब्ध करून दिली आहे. ही संधी फक्त येत्या 4 ऑगस्टपर्यंत आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटे द्यावी लागणार. संरक्षण मंत्रालयाने MyGov.in च्या मदतीने सध्या कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक ऑनलाइन स्पर्धा सुरु केली आहे. 4 ऑगस्टपर्यंत असणाऱ्या या स्पर्धेत भाग घेण्याऱ्या स्पर्धकाला फक्त 5 मिनिटांत जास्तीत जास्त 20 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. जो स्पर्धक कमीत-कमी वेळेत जास्तीत जास्त योग्य उत्तरे देईल, त्याला विजयी घोषित करण्यात येईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी MyGov.in (https://quiz.mygov.in) प्लॅटफॉर्मला भेट द्यावी लागणार आहे. या स्पर्धेती विजेत्यांना 10 निधी स्वरुपात पुरस्कार दिले जातील. पहिला पुरस्कार 25000 रुपयांचा आहे. दुसरा पुरस्कार 15000 रुपयांचा असणार आहे. तर तिसरा पुरस्कार 10000 रुपयांचा असेल. याशिवाय, 7 लोकांना सांत्वन पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार 5000 रुपयांचा असणार आहे. तसेच, टॉपच्या 100 विजेत्यांना संरक्षण मंत्रालयाकडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी आहेत. उदाहरणार्थ, एक व्यक्ती स्पर्धेत एकदाच भाग घेऊ शकतो. भाग घेणाऱ्या स्पर्धकाला आपले नाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतिथी, पत्ता, ई-मेल आणि मोबाईल नंबरची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच, एक मोबाइल नंबर आणि एक ई-मेल दुसऱ्यांदा वापरता येणार नाही. याशिवाय, विजेत्यांना आपले ओळखपत्र, वय, पत्ता यासंबंधी मूळ प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. जमा न केल्यास निवड रद्द केली जाईल.