मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कर्नाटक: सभापती रमेश कुमार यांचा सरप्राईझ राजीनामा

कर्नाटक विधानसभेमध्ये मांडण्यात येणारा विश्वास प्रस्ताव बी. एस. येडियुरप्पांचं भाजप सरकार जिंकलं आहे.
 
मात्र यानंतर लगेचच विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे.
 
भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 105 जागांची आवश्यकता होती. भाजपकडे 105 आमदार आहेत आणि एका अपक्ष आमदाराचं भाजपला समर्थन मिळालं. त्यामुळे भाजपने सहज आपलं बहुमत सिद्ध केलं.
 
विश्वासदर्शक ठरावाआधी माजी सभापती रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 17 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे सभागृहातील आमदारांची संख्या 225 हून 208 वर गेली होती. विश्वासदर्शक ठराव हारल्यानंतर रमेश कुमार यांनी आपला राजीनामा दिला.
 
पण सभापती रमेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही सूचक वक्तव्यं केली होती. 14 काँग्रेस आणि जेडीएस आमदारांचं निलंबन जाहीर करताना सर्वांनी "सरप्राईझसाठी" तयार रहावं, असं ते म्हणाले होते.
 
विश्वासदर्शक ठरावानंतर राजीनामा देणार का, हे विचारल्यावर रमेश कुमार म्हणाले, "तुम्हाला त्याविषयी उद्या कळेल. आजही या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला साडेनऊ-दहापर्यंत माहीत नव्हतं. तसंच तुम्हाला उद्या आणखी एक सरप्राईझ मिळेल."
 
ज्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे ते आमदार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.