सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 29 जुलै 2019 (10:26 IST)

हॉटेलमध्ये दोन केळी ४०० रुपये राहुलची तक्रार पंचतारंकित हॉटेलला चारशे पट दंड

प्रसिध्द अभिनेता राहुल बोसला केवळ २ केळ्यांवर जीएसटी लावून ४४२ रूपये बिल पाठवणार्‍या नामांकित अशा जे डब्ल्यू मॅरिएट या फाईव्हस्टार हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाने सीजीएसटी सेक्शन ११ नियमांचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी ४०० पट दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेलला २५ हजार रूपयांचा दंड बसला आहे. राहुल बोसने याबाबत जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये केवळ २ केळीचं ४४२ रूपये बिल लावण्यात आल्याचे ट्विट करून सांगितले आहे. त्याची गंभीर दखल घेत चंदिगडच्या अबकारी विभागाचे उपायुक्‍त मनदीप सिंग ब्रार यांनी याबाबतची सखोल चौकशी करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत. राहुल बोस हा एका चित्रपटाच्या शुटींगसाठी चंदिगडमध्ये आहे. तो जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये थांबला होता.वर्कआऊट करण्यासाठी जीममध्ये गेल्यानंतर त्याने हॉटेलमध्ये २ केळयांची ऑर्डर दिली होती. त्यानंतर त्यानं बील मागवलं. त्यावेळी हॉटेलने जीएसटी लावून केळ्यांचं ४४२ रूपये बील पाठवलं. बील पाहून राहूल बोसची भंबेरी उडाली. त्यानंतर तात्काळ ट्विट केलं आणि त्याची गंभीर दखल घेण्यात आली. दरम्यान, हॉटेलला ४०० पट दंड ठोठावण्यात आला असून आता हॉटेलला २५ हजार रूपयांचा दंड बसला आहे.