गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (14:11 IST)

आता मॅन्युअली एका क्लिकवर फोनचा बॅकअप घ्या

आतापर्यंत अॅण्ड्रॉईड फोनवर गुगल ड्राइव्हमध्ये आपोआप बॅकअप सेव्ह होत असे. पण यासाठी फोन चार्जिंगवर असणं आणि  फोन वायफायवर कनेक्ट असणंही गरजेचं होतं. पण आता या सर्वांची गरज नाही. मॅन्युअली एका क्लिकवर फोनचा बॅकअप गुगल ड्राइव्हवर घेतायेणार  शकणार आहात.
 
आता यासर्वावर उपाय म्हणून 'बॅकअप नाऊ' नावाचं ऑप्शन दिसणार आहे. 2014 मधील अॅण्ड्रॉईड मार्शमॅलो ओएसवर हे फिचर चालत होत पण आता हे सर्व डिव्हाइसवर हे सुरू करण्यात आलंय. फोनचा युएसबी पोर्ट आणि वायफाय सेंसर खराब झालेल्यांना याचा फायदा होणार आहे. यातील काही एक बंद असल्यास डेटा बॅकअप घेणं कठीण व्हायचं. पण आता या नव्या सुविधेमुळे डेटा बॅकअप घेणं सोप्प झालंय.
 
तपासून पाहा 
आपल्या फोनच्या गुगल सेटींग्जमध्ये जाऊन बॅकअप बटणवर क्लिक करा
 
बॅकअप बटणावर क्लिक केल्यावर निळ्या रंगाचे 'बॅकअप नाऊ'चे ऑप्शन येईल.
 
'बॅकअप नाऊ'वर क्लिक केल्यानंतर फोनची डेटा कॉपी ड्राइव्हवर बनेल
 
ज्या फोनमध्ये आतापर्यंत 'बॅकअप नाऊ'चे ऑप्शन नाही दिसतंय त्यांना लवकरच सॉफ्टवेअर अपडेट येईल.