गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (12:24 IST)

राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे : पाटील

अजित पवार यांना अटक करण्यास रोखले कोणी?
 
राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे आहोत. विरोधकांची भूमिकाही शिवसेनाच करीत आहे. अजित पवार बोलायला लागले की, आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, असे सुनावले जाते. मात्र चार वर्षांत भाजपने पवार यांना 71 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असतानाही अद्याप जेलध्ये का टाकले नाही? त्यांना अटक करण्यासाठी शिवसेनेने अडवले होते काय? असा सवाल करीत राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा अहेर दिला.
 
चोपडा येथे आयोजित एका जाहीरसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर चोपड्याचे आदार प्रा. चंद्रकांत सोनवणे होते. राज्यंत्री पाटील पुढे म्हणाले की, पुतण्याला वाचवण्यासाठी शरद पवार यांनी राज्य सरकार स्थापन करताना आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, असे सांगून भाजपला जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अजित पवार यांच्यावर कारवाई होत नसल्याचेही ते म्हणाले. 
 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावरही राज्यमंत्र्यांनी टीका केली. ते म्हणाले की, महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उजव्या बाजूला बसतात. मात्र, त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही एवढेच नाही, तर यांनी निम्न तापी प्रकल्पाचे काही केले असते तर लोकांनी गावागावात महाजन यांचे फोटो लावले असते.