ताडोबात पर्यटकांनी नियम तोडले, वाघीण पिल्लांचा रस्ता अडवला  
					
										
                                       
                  
                  				  अवनी वाघीण मृत्यू ताजा आहे, त्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आता अजून एक संताप देणार प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षण आहे. दिवाळी निमित्त  सलग सुट्यांमुळे हा प्रकल्प पर्यटकांनी भरून गेला आहे. त्यात आता सोशल मीडियावर वायरल झालेल्या काही दृश्यात पर्यटक ताडोबा प्रकल्पातील नियम धुडकावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चक्क स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी संताप देणारा प्रकार केला आहे. ताडोबातील माया वाघीण म्हणजे वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचे स्पष्ट दृश्यात समोर येते आहे. हा प्रकार वन्यजीवप्रेमींना विचलित करणारा असून ताडोबातील व्यवस्थापनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अत्यंत संथ गतीने आपल्या पिलांसह करणाऱ्या वाघिणीच्या पुढे जिप्सी नेत रस्ता रोखल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री आणि वन मंत्री यांनी याची चोकशी करावी अशी मागणी केली आहे.