गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जाणून घ्या संतान रूपात कोण येतं आपल्या घरी...

पूर्व जन्माच्या कर्मानुसार वर्तमान जन्मात आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी, प्रियकर, मित्र, शत्रू आणि इतर नाती या जन्मात पदरी पडतात. या सर्वांकडून आपलं काही देणं-घेणं ठरलेलं असतं म्हणून ते या जन्मी आपल्या जवळपास असतात. 
 
तसेच हे जाणून घेणेही मनोरंजक ठरेल की संतानच्या रूपात कोण आणि कशाला उद्देश्याने आपल्या जीवनात येतात.
 
ऋणानुबंध
पूर्व जन्मात आपल्यावर कोणाचे ऋण असल्यास किंवा आपण त्याचे धन नष्ट केले असल्यास ती व्यक्ती संतान रूपात जन्म घेते आणि आपले धन तो पर्यंत आजार किंवा व्यर्थ गमावते जोपर्यंत हिशोब पूर्ण होत नाही.
 
शत्रू
पूर्व जन्मातील एखादा शत्रू वचपा काढण्यासाठी आपल्या जीवनात येत असून वाद, मारहाण अशा प्रकारे छळ काढत असतो.
 
उदासीन
या प्रकाराची संतान आई- वडिलांना कोणत्याही प्रकाराचे सुख देत नाही. सेवा तर दूर त्यांना लाचार करून मरण्यासाठी सोडून देते.
 
सेवक
आपण पूर्व जन्मी एखाद्याची खूप सेवा केली असल्यास अशी संतान जन्म घेते. ऋण फेडण्यासाठी येणारी ही संतान आई- वडिलांची खूप सेवा करते.
 
आश्चर्य म्हणजे ही गोष्ट केवळ मनुष्यावर लागू होत नसून या जनावरांवर देखील लागू होते. जनावरांची नि:स्वार्थ सेवा आणि स्वार्थ भाव ठेवून पाळणे व काम झाल्यास त्यांना घरातून काढून देणे, किंवा निरपराध जीवांना सतावणे हे देखील आपलं भविष्य ठरवतं. जे पेराल तेच उगवेल निसर्गाचा नियम आहे हा... आपण या जन्मी केलेलं पुण्य पुढील जन्मात शंभर पटीने परत मिळेल. उलट कोणासोबत वाईट वागणुकीची शंभर पटीने परतफेड करावी लागेल. म्हणून चांगले कर्म करून आपल्या खात्यात पुण्याई जमा करत राहावी.
 
रिकाम्या हाती आलेला व्यक्ती जाताना देखील रिकाम्या हाती जाणार. पैसा, घर, तुझं, माझं हे सर्व येथेच राहणार... सोबत जाईल केवळ पुण्याई...