शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मूत्रापासून इंधन बनवणारी पावडर!

वॉशिंग्टन- निसर्गाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही असे म्टले जाते. एक नवे संशोधन हेच अधोरेखित करीत आहे. संशोधकांनी एक अशी अॅल्यु‍मिनियम नॅनो पावडर बनवली आहे जी मूत्राचे रूपांतर तत्काळ हायड्रोजन मध्ये करू शकते. त्याचा वापर इंधनाच्या सेलला ऊर्जा देण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
विशेष म्हणजे याबाबतचे संशोधन करणार्‍या संशोधकांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अमेरिकन सैन्याच्या रिसर्च लॅबोरेटरीमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी आधी जाहीर केले होते की त्यांचे नॅनो- गॅल्वेनिक अॅल्युमिनियम पावडर पाण्याच्या संपर्कात येताच शुद्ध हायड्रोजनचे उत्पादन करू शकते. आता त्यांनी पाण्याचे संमिश्रण असलेल्या कोणत्याही द्रव पदार्थाचाही असाच वापर केला. त्यामध्येही पावडर मिसळली तरी मोठ्या प्रमाणात हायड्रोजन निर्माण होतो.
 
सैनिकांना थेट लाभ मिळावा हा सैन्य दलाशी संबंधित संशोधकांचा हेतू असतो. आता कोणतेही प्रदूषण न करता वीज उत्पन्न करण्याचीही नवी पद्धत त्यांनी शोधली आहे.