बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : रविवार, 26 जून 2022 (10:11 IST)

राजर्षी शाहू महाराज जयंती

Shahu Maharaj
महाराष्ट्रातील समाज सुधारक-राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) : राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.
जन्म : २६ जुन १८७४
मृत्यू : ६ मे १९२२
पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले
वडील :आबासाहेब घाटगे
आई : राधाबाई
पत्नी :  महाराणी लक्ष्मीबाई भोसले
 
राजर्षी शाहू महाराज बालपण आणि शिक्षण
इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.
 
छत्रपती शाहू महाराज महत्वाचे कार्य
१९०२ साली शाहू महाराजांनी “पाटबंधारे धोरण” घोषीत केले.
२६ जुलै १९०२ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवगीय लोकांसाठी ५० टक्के जागा राखीव / आरक्षीत ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा ‘करवीर गैजेट” मधुन प्रकाशित करण्यात आला होता.
१९०५ साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामें जप्त केली व छात्र जगतगुरुचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्या “सदाशिव बेनाडीकर” यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आली.
तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातीचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता “पुरोहीत शाळा” निर्माण केल्या.
१९०६ मध्ये शाहु महाराजांनी “छत्रपती शाहू स्पिनींग व जिनींग मिल” स्थापन केली. (२००३ मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे) 0 १९०६ साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानात “रात्रशाळा” सुरु केल्या. तर १९०७ साली शाहु महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
१९०७ साली कोल्हापुरच्या पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई” हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडुन करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर “राधानगरी” हे गाव बसविण्यात आले.
१९०८ साली शाहु महाराजांनी अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.
२० मे १९११ रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत विद्याथ्यांना १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.
प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय
१९११ साली शाहु महाराजानी शिंपी समाजाच्या मुलांसाठी “नामदेव वस्तीगृह” सुरु केले.
 
छत्रपती शाहू महाराज विशेषता
राजर्षी शाहू महाराजांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत यथार्थपणे गौरविलेले आहे.