गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (12:44 IST)

आझादी सॅटेलाईट अवकाशात झेपावलं तेव्हा...

isro
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं इस्रोनं आझादीसॅट नावाचा सॅटेलाईट (कृत्रिम उपग्रह) अवकाशात प्रक्षेपित केला आहे.
 
देशभरातल्या 750 सरकारी शाळांमधील मुलींनी हा सॅटेलाईट तयार करण्यात सहभाग घेतला आहे.
 
इस्रोच्या नव्या एसएसएलव्ही रॉकेटनं हा सॅटेलाईट त्याच्या कक्षेत पोहोचवला. एसएसएलव्ही अर्थात स्मॉल सॅटेलाईट लाँच वेहिकल हे इस्रोनं तयार केलेलं अवकाशयान छोट्या सॅटेलाईट्सच्या प्रक्षेपणासाठी आणि व्यावसायिक दृष्टीनं तयार करण्यात आलं आहे.
 
श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून या वाहनानं आझादीसॅटसह सकाळी 9.18 वाजता उड्डाण केलं. त्यावेळी हा सॅटेलाईट तयार करणाऱ्या मुलींपैकी चारशेहून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
 
8 किलो वजनाच्या या सॅटेलाइटमध्ये 75 फेमो एक्सपेरिमेंट आहेत आणि यात सेल्फी घेणारा कॅमेराही लावण्यात आला आहे, जो या सॅटेलाईटच्या सोलर पॅनलचे फोटो काढेल.
 
लवकरच होणार घोषणा
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं इस्रोनं आझादीसॅट नावाचा सॅटेलाईट (कृत्रिम उपग्रह) अवकाशात प्रक्षेपित केला. पण आनंदाचं रुपांतर लगेचच चिंतेमध्ये झालं.
 
एसएसएलव्हीचं हे पहिलंच उड्डाण होतं आणि त्यात सगळे टप्पे अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाल्याचं इस्रोनं जाहीर केलं आहे. पण अखेरच्या क्षणी डेटा लॉस झाल्याची, म्हणजे काही माहिती मिळत नसल्याची नोंद झाल्याचं इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी जाहीर केलं.
 
इस्रो या माहितीचं विश्लेषण करत असून, लवकरच त्याविषयी घोषणा केली जाईल असंही ते म्हणाले.