रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (08:22 IST)

मुसलमान समाज "भारतीय" कधी होणार?

स्वातंत्र्यानंतर गेल्या ७२ वर्षांच्या भारताच्या इतिहासात अनेक प्रश्न अनुत्तीर्ण राहिलेले होते. मुळात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेच अनेक गंभीर प्रश्न उत्पन्न करतच. स्वातंत्र्यपूर्व भारतात मुसलमान समाजाला असं वाटत होतं की ते भारताचे राज्यकर्ते होते. इंग्रज येण्याआधी मुस्लिमांनी या देशावर राज्य केलं होतं असा भारतीय मुस्लिमांचा गोड गैरसमज आहे. इंग्रजांच्याविरोधात स्वातंत्र्य लढाईत मुस्लिम लीग हिरहिरीने सहभागी झाली नव्हती. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही नावे सोडली तर सामुहिकरित्या मुस्लिम लीगने दाखवण्यापुरता स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिला तो खिलाफत चळवळीच्या वेळी. मुस्लिम लीगने कॉंग्रेस समोर अट ठेवली होती जर तुम्हाला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आमचा पाठिंबा हवा असेल तर खिलाफत चळवळीला पाठिंबा द्या. कॉंग्रेसने ही अट कबुल केली आणि खिलाफत चळवळीत कॉंग्रेस मुस्लिम लीगसोबत रस्त्यावर उतरली. पण इंग्रजांनी तुर्कीस्तानात खलिफाला न बसवता केमालपाशाला बसवल्यानंतर त्यांनी दंगली पेटवल्या, हिंदूंची कत्तल केली, महिलांवर बलात्कार केला. मुस्लिम लीगचा डायरेक्ट ऍक्शन हा शब्द जरी आठवला तरी मनाचा थरकाप उडतो. इतका अमानवी अत्याचार ह्यांनी भारतीय समाजावर केलेला आहे.
 
बाबरीचा जुनाट ढाचा पाडल्यानंतर जी दंगल पेटली त्याचे पाप स्वयंघोषित सेल्युलर लोकांनी कारसेवकांच्या माथी मारले. नरेंद्र मोदींना मौत का सौदागर म्हणण्यात आलं. हिंदू समाजाला जितकं बदनाम करता येईल तितके केले. पण यापूर्वी अशा अनेक दंगली घडलेल्या आहेत. जानेवारी २०१३ ला धुळ्यात झालेल्या दंगलीचे सत्यशोधन करायला "धुळे दंगल सत्यशोधन समिती"सोबत मी सुद्धा गेलो होतो. या सत्यशोधनाच्या मोहिमेत मला निवृत्त पोलिस महानिरीक्षक वाय.सी पवार, निवृत्त न्ययाधिश सुधाकर चपळगावकर आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी ह्यांच्यासोबत काम करण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी माझ्या लग्नाला फारसे वर्ष झाले नव्हते आणि आमच्या पदरात लहान बाळ होतं आणि दंगलसदृश भागाची पाहणी करायला जातोय म्हणून माझी पत्नी चिंतीत होती. सत्यशोधन करताना या समाजाची मानसिकता मला जवळून अनुभवायला मिळाली आहे. मी अनुभवलं की दंगलीबद्दल बोलताना हिंदू प्रचंड घाबरलेले होते आणि मुस्लिम अतिशय आवेगाने दंगलीतील वृत्त सांगत होते. हा माझ्यासाठी आश्चर्याचा नव्हे पण नवा धक्का होता.
 
ज्यावेळी भारत सरकारने सीएए लागू करणार अशी घोषणा केली आणि संवैधानिक व लोकशाही पद्धतीने सीएए बिल पास केला त्यावेळी मुस्लिम समाजाने देशात प्रचंड दंगली घडवल्या. या दंगलींना स्वयंघोषित सेक्युलर लोकांनी मानसिक बळ दिले. दंगलीची झळ महाराष्ट्राला नाही बसली कारण दंगली या भाजप शासीत राज्यांमध्ये घडवल्या होत्या. सीएएमुळे मुस्लिम समाजाचे कोणतेच नुकसान होणार नाही असं पोटतिडकीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सांगत होते तरी या समाजाने ऐकण्याची मानसिकता कधीच दाखवली नाही. सीएए मुस्लिम विरोधात का आहे? हे कुणालाच सांगता आलेलं नाही. तरी सुद्धा स्वयंघोषित सेक्युलर लोकांनी दंगलीला पाठिंबा दिला आणि दंगल पेटेल असे वातावरण निर्माण केले. आता सबंध जगावर कोरोनाचं संकट कोसळलं असताना हा समाज त्या विरुद्ध बोलत आहे. अनेक व्हिडिओ फिरत आहेत ज्यात कोरोनाला मास्क न लावण्याचे फिजिकल वा सोशल डिस्टन्स न पाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन हिंदूंनी आपले नववर्ष साजरे नाही केले, रामनवमी साजरी केली नाही, देवळे बंद केली. पण मुस्लिम समाजाने मात्र मुशिदी चालूच ठेवल्या. सामुहिक मिलन सुरुच ठेवले. देशापेक्षा आपला पंथ ह्यांनी नेहमीच मस्तकी धरला आहे. पण या समाजाला राम आपला वाटत नाही ही चिंतेची बाब आहे. राम आपला वाटणे म्हणजे सामाजिक मर्यादा पाळणे होय. अजित डोवालांना मध्यरात्री दोन वाजता जाऊन मशीद खाली करावी लागते ही अतिशय चिंतेची बाब आहे. इतकी साधी गोष्ट या समाजाला का कळत नाही? तबलिघी जमातचे मुस्लिम लोक आधी पोलिसांवर थुंकले, नंतर डॉक्टरांवर थुंकले. आता तर हे लोक ज्या नर्स ट्रिटमेंट देत आहेत त्यांच्या समोर अश्लील गाणी म्हणतायत, कपडे काढून फिरतायत, सिगरेटची मागणी करतायत. त्यामुळे तिथल्या नर्सना अश्लील चाळे करणार्‍यांची सेवा करताना त्रास होतोय. म्हणजे जे पोलिस ह्यांच्या सुरक्षेसाठी झटतायत त्यांच्यावर हे थुंकणार? जे डॉक्टर ह्यांच्यावर उपचार करतायत त्यांच्यावर हे थुंकणार? आणि ज्या नर्स आईच्या मायेने यांची सेवा करतायत त्यांच्यासोबत हा समाज अश्लील चाळे करणार? पण आपण काहीच बोलायचं नाही... श्श्शू... कारण सेक्युलरिझ्म आहे बुवा...
 
महाराष्ट्रातही पोलिसांवर मारहाण झालेली आहे. भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काही अपवाद वगळता आपण सर्वांनी मिळून कठोर प्रतिकार केला. याबबात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोदींचे कौतुक केले आहेत. लॉकडाऊन दरम्यान गरीबांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोझ अधनोम घेबरेयेसस प्रभावित झाले आहेत. आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाला हद्दपार करणार होतोच तेव्हा तबलिघी जमातीने आपला गलिच्छ डाव आखला. यांच्यामुळे आज आटोक्यात आलेला कोरोना व्हायरस देशभर पसरत आहे. अनेक राज्यांत तबघिली जमातीचे कोरोग्रस्त लोक सापडत आहेत. त्यांनी हजारो वर्षांआधी सांगितलेले धार्मिक नियम पाळण्यासाठी आपल्या प्राणाहुन प्रिय असलेल्या मातृभूमीला पुन्हा एकदा संकटात टाकले आहे. पण स्वयंघोषित सेक्युलर्स मात्र चिडीचुप्प आहे. मुस्लिम समाज भारतीय झाला नाही म्हणजे सुसंस्कृत झाला नाही याचे पाप कॉंग्रेसच्या आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या माथी जाते. हातात हात घालून चालणार्‍या या कॉंग्रेस आणि स्वयंघोषित पुरोगामी संस्कृतीने घाणेरडे राजकारण खेळण्यासाठी मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहात येऊ दिले नाही. नरेंद्र मोदी त्यांना मूळ प्रवाहात आणण्याच अपराकोटीचा प्रयत्न करत आहेत. स्वा. सावरकर आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांनाही मुस्लिम समाज मूळ प्रवाहात आलेला हवा होता. पण त्यंच्या हयातीत हे शक्य झाले नाही. कॉंग्रेसने आणि डाव्यांनी ते शक्य होऊ दिले नाही. आपल्याला फाळणी मिळाली ती सुद्धा आपल्या बांधवांचे रक्त सांडून आणि आपल्या आई-बहिणींवर बलात्कार होऊन... आता हा प्रश्न आ वासून आपल्या समोर उभा आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधक खंबीर निर्णयात मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही. त्रिपल तलाक असो, ३७० असो, सर्जिकल वा एअर स्ट्राईक असो किंवा सीएए असो. हे विरोधक मोदींना विरोध करण्यासाठी कॉंग्रेस आणि डाव्यांच्या होमध्ये हो मिसळू लागले. मोदींना निवडून दिलेल्या मतदारांना भक्त म्हणण्याची परंपरा आणि स्वयंसेवकांना संघोट्या म्हणण्याची परंपरा डाव्यांनी सुरु केली आणि या विरोधकांनी डाव्यांनी निर्माण केलेल्या द्वेषाच्या तळ्यात डुंबकी मारली...
 
आता या सगळ्या गोष्टींचे परिणाम सबंध देशाला भोगावे लागत आहेत. स्वयंघोषित पुरोगामी आणि कॉंग्रेसींनी मुस्लिमांना नागरिकशास्त्र शिकवलं नाही. अंदमानमध्ये बंदिस्त असताना स्वा. सावरकरांनी अंदमानातील कैद्यांना (सगळेच कैदी स्वातंत्र्य सैनिक नव्हते, दरोडेखोर वा गंभीर गुन्हेगारही होते.) नागरिकशास्त्र शिकवलं आहे. सावरकरांनी कैद्यांशी सुसंवाद साधला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुस्लिम लीगची समस्या आपण समजून घेतली नाही. ती समस्या कळली सावरकरांना, ती समस्या कळली डॉ. आंबेडकरांना. ही समस्या आता आपण समजून घेतली पाहिजे. हा समाज मानसिक आणि शारिरीकरित्या भारतीय म्हणजे सुसंस्कृत झालेला नाही. दंगली घडवणे, पोलिसांना मारहाण करणे, डॉक्टरांवर थुंकणे आणि नर्सेसमोर अश्लील चाळे करणे हे सुसंस्कृतपणाचं लक्षण मुळीच नाही. म्हणून आता भारत सरकारने बाप होऊन तबलिघी जमातीला हाताळलं पाहिजे. बिघडलेलं मूल जेव्हा आईचं ऐकत नाही तेव्हा आई बिघडलेल्या मुलाला बजावते की बाबांना नाव सांगेन. तेव्हा बिघडलेलं मूल घाबरतं. पण तरी सुद्धा ऐकलं नाही तर आई खरोखरच बाबांना नाव सांगते आणि बाबांनी दोन रट्टे लगावल्यावर बिघडलेलं मूल भानावर येतं. भारत आणि राज्य सरकारने राजधर्माचे पालन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोलिसांनी सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे बिरुद आठवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत सुरु आहे. शासनाला रामायणातून सज्जनांशी कसं वागायचं हे शिकता येईल आणि महाभारतातून दुर्जनांशी कसं वागायचं हे शिकता येईल...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री