मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (11:17 IST)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार…

balasaheb thackeray
* जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.
 
* तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
 
* पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
 
* मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
 
* माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
 
* मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.
 
* वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
 
* एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र ही टिकेल.
 
* नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.
 
* तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.
 
* माझा प्रत्येक गुन्हा माझा विचार बनून लाखो लोकांच्या रक्तात वाहेल आणि त्या रक्तातील प्रत्येक थेंबात जिवंत राहील हा "बाळ केशव ठाकरे" 
 
* मराठी हा सन्मान आहे. मराठीला "व्हाय" विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे. 
 
* या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा नसेल तर मग कशात भिनवायचा ? म्युनिसिपाल्टीच्या नळात ?
 
* आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस... हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..
 
* चिथावणी वगैरे काही नाही. आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. आम्ही देवनार चे बोकड नव्हे. 
 
* भारतात बहुसंख्य हिंदू असताना.. हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता? उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा.