मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (17:52 IST)

World Chimney Day जागतिक चिमणी दिवस!

World Chimney Day
एक एक कडी जमवून घरटे बांधते,
चिव चिव करून मी तुम्हां सुखावते,
अवती भवती तुमच्या माझं जग आहे,
झाडा झाडांवर माझं घरटं आहे,
पण आताशा झाडं कापल्या जातात,
आमची चिमुकली घरटी संकटात येतात,
पूर्वी आमच्या गोष्टी ऐकून, बाळ पोटभर जेवत असे,
चिऊ ये काऊ ये म्हणत, तो हसत असे,
आता मात्र मला कुठं निवारा मिळत नाही,
घरटं बांधायला कुठं मज जागाच नाही,
द्या मज जागा तुम्ही, तुमच्या घरात अन मनात,
नाहीतर कशा सांगाल बरं आमच्या गोष्टी, मुलांच्या कानात?
आम्ही ही उडू भुर्रकन, त्यांच्या अवतीभवती,
करू चिवचिवाट राहू सदा तुमचे सोबती!
..अश्विनी थत्ते.