World Day Against Child Labour 2026: बालमजुरीविरोधी जागतिक दिन
आज १२ जून म्हणजेच बालमजुरीविरोधी जागतिक दिन आहे. बालमजुरीच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मुलांचे बालपण, शिक्षण व सुरक्षितता सुरक्षित करण्यासाठी हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. तसेच या दिवसाचा उद्देश मुलांच्या शोषणाविरुद्ध जागरूकता पसरवणे आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे बालकामगार निर्मूलनासाठी पावले उचलणे हा आहे. हा दिवस शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि काम करण्यास भाग पाडलेल्या मुलांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधतो.
इतिहास आणि सुरुवात
सुरुवात: 'आंतरराष्ट्रीय कामगार संघटना' (ILO - International Labour Organization) या जागतिक संस्थेने २००२ मध्ये या दिवसाची सुरुवात केली.
उद्देश: ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना मजुरीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे.
बालमजुरीची कारणे
गरीबी: अनेक कुटुंबांमध्ये गरिबीमुळे मुलांना लहान वयातच कामावर जावे लागते.
शिक्षणाचा अभाव: योग्य आणि मोफत शिक्षणाच्या सोयींची माहिती नसणे किंवा त्या उपलब्ध न होणे.
स्वस्त मजूर म्हणून गैरवापर: हॉटेल्स, कारखाने किंवा विटभट्ट्यांवर लहान मुलांना कमी पगारात जास्त काम करून घेता येते, म्हणून त्यांचा गैरवापर केला जातो.
भारतीय संविधान आणि कायदे
भारतात बालमजुरीला आळा घालण्यासाठी कडक कायदे आहे
अनुच्छेद २४: १४ वर्षांखालील कोणत्याही मुलाला कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे.
बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, १९८६: या कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुलांकडून काम करून घेणे हा दंडनीय गुन्हा आहे.
शिक्षणाचा अधिकार (RTE): ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे.
Edited By- Dhanashri Naik