जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल

World Environment Day
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाला वाचविण्यासाठी काही पावले उचल्य्याने आपल्या येणार्‍या पिढ्या या पृथ्वीवर शुद्ध हवेत श्वास घेऊ शकतील.
* स्वच्छता म्हणजे कचऱ्याचे उत्कृष्ट पद्धतीने निरसन करणे. कचऱ्याचा पुनर्वापर करणे, घाण न पसरवणे. कचऱ्याला रिसायकल करणे देखील गरजेचे आहे.

* वनस्पतीमधून निघणारे कार्बन डायऑक्साइड पृथ्वीमध्ये परत जाऊ द्यावे. कोळशापासून वीज निर्मिती करणार्‍या प्रकल्पांचा कार्बन डायऑक्साइडला वाढवून पर्यावरणाला दूषित करण्यात मोलाचा वाटा आहे. त्यांसाठी हे प्रकल्प प्रभावी ठरू शकतं. अश्या तंत्रज्ञानामुळे वीज निर्मिती वाढेल पण कार्बनच्या उत्सर्जनात मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कृती अमलात आणल्याने औष्णिक प्रकल्प वाचू शकतात.
* ऊर्जा वाचविण्यासारख्या गोष्टी कडे लक्ष द्या जसे कमीत कमी वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर करा. कॉम्प्युटरला हायबरनेट मोड वर ठेवल्याने ऊर्जा वाचते असे काही नाही पण कार्बनचे उत्सर्जन अजून वाढते. काही काम नसल्यास कॉम्प्युटरला बंद करून ठेवावे. असे करणे सर्वांसाठीच फायदेशीर आहे. आणि संगणकासाठी देखील.

* वीज कमी वापरा. ग्रीन लेबलची उपकरणे वापरा,
कमी खप असलेल्या बल्बचा वापर करण्याची सुरुवात भारतात झाली असून त्यांचा किंमतींत घट करण्याची आणि अश्या प्रकल्पांना दत्तक घेण्याची गरज आहे. यासाठी घरातील वीज कनेक्शनला जोडण्यासाठी मीटर मदत करेल. दुसरीकडे ऊर्जा कार्यक्षमता विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे फ्रीज, एसी, कूलर, हीटर, इस्त्री, ओव्हन सारख्या उपकरणांवर आता ग्रीन लेबल दिसू लागले आहेत. हे लेबल हे दर्शवते की हे उपकरण किती प्रमाणात वीज वापरेल. विकत घेण्याआधी ग्रीन लेबल बघून घ्या.
* कमी इंधनाचे उपकरण वापरा. कधी कधी आपण उपयोगात नसलेले वाहने उपकरण आपल्या घरात ठेवत असतो. जर का ते जास्त प्रमाणात वीज आणि इंधन घेत आहे जसे की जुने स्कुटर, कार, जीप, पंखे किंवा जुनी झालेली डिझेल मोटार. जे सामान्यांपेक्षा जास्त वीज खपत करतातच त्याच बरोबर कार्बन उत्सर्जनामध्ये त्यांचा वाटा असतो तर अश्या गोष्टींना आपल्या घरातून काढून टाकावे. जेणे करून आपल्या वीज इंधन आणि पैसे वाचतील. हाताने चालणाऱ्या उपकरणांचा अधिक वापर करावा.
* बायोगॅस प्रकल्पाला घरी आणा. सूर्याची ऊर्जा, पवनची ऊर्जा आणि शेणापासून निर्मित बायोगॅस आणि वीज हे प्रत्येक घरात असलेलं चांगलं विकल्प आहे. हे लाकूड, गवऱ्या, आणि कोळशाच्या चुली पासून सुटका देतात. तर मग सूर्यदेव, पवनदेव आणि पशूंपासून मिळणाऱ्या शेणाचे आभार मानून बायोगॅस ऊर्जेला घरोघरी आणण्यासारखा कार्याला लागावे.

* भौगोलिक ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाचे विश्लेषण करा. वैज्ञानिक सांगतात की ज्वालामुखीं मध्ये वीज निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. अंदमान निकोबार सारख्या भारतीय बेटांमध्ये अनेक ज्वालामुखी जमिनीच्या गर्भात निजलेल्या अवस्थेत असून यावर विचार केला जाऊ शकतो. हायड्रोजनचे उत्पादन आणि त्याचे संग्रह एक मोठी समस्या आहे पण हायड्रोजनाने चालणाऱ्या दुचाकी किंवा तीनचाकी वाहने हे चांगलं पर्याय म्हणून असू शकेल का, यावर विचार करावा.

* कमी इंधनाचा वापर करणारे वाहन वापरा. सध्या हायब्रीड वाहनांचा काळ आहे जे कमी प्रमाणात इंधन खातात. काळे विषारी धूर सोडत नाही. लाल दिवा आल्यावर आपोआप बंद होतात. आपल्या वाहनांना अश्या यंत्रणेसह बाजारपेठेत येऊ देण्याचा दिशेने कार्य करायला पाहिजेत.
* सार्वजनिक वाहनांचा आदर्श ठेवावा. सार्वजनिक वाहनांना सर्व सोयीसह आणि आरामशीर प्रवास करण्यासाठी उपयुक्त बनविणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर शासनाने आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वाहन भत्त्यामध्ये कपात करून घरापासून कमीत कमी अंतरावर नियुक्ती आणि बदलीचे धोरण अमलात आणून इंधन खर्चात आणि खपत मध्ये बचत करू शकतो. जवळपास जाण्यासाठी आपण सायकल देखील वापरू शकता.

* वीट, सिमेंट, स्टीलच्या रचना कमी करून ग्रीन फ्रेम वापराव्यात. वीट, सिमेंट आणि स्टील हे कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास जवाबदार आहे. ह्यांना बनवताना लागणाऱ्या इंधनाचे वापर जास्त न करू शकल्याने या घटकांनाच दोषी मानले जाते. या ठिकाणी हिरव्या रचना उपर्युक्त ठरतात. एखादी जागतिक आपत्ती आल्यास या कुठल्याही बांधकामाची नासाडी होते. परत ते बांधण्यासाठी खर्च करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापनाद्वारे हा खर्च रोखला जाऊ शकतो.
* गावाचे शहर करू नये. वाढते स्वप्न, वाढते खर्च आणि वाढणारे बाजारपेठ याचा अर्थ असे नाही की गावात आणि शहरांमध्ये भेद करू नये. त्यासाठी शहराला गावासारखं बनवा, गावाला शहर बनू देऊ नका.

* पॉलिथिनचा वापर करू नये. पॉली कचरा आणि ई कचरा हे दीर्घकालीन विष आहे. हे जाळणे आणि माती खाली पुरणे हे विषारी आहे. सहस्त्र वर्षानंतर आपल्या वंशजांनी जमीन खणल्यावर त्यांना कचरा दिसला तर आपला समजा असभ्य असल्याचे कळून येईल. पॉलिथिनच्या ऐवजी कागदाचा वापर करावा आणि आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवा.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

IND vs NZ 1st Test: चवथ्या दिवशीचा खेळ संपला, शेवटच्या ...

IND vs NZ 1st Test: चवथ्या दिवशीचा खेळ  संपला, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 280 धावांची गरज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा चौथा दिवस संपला. भारताच्या 284 धावांच्या ...

ही व्यक्ती आश्चर्यकारक आहे! अनेक मुलाखती दिल्या पण नोकरी ...

ही व्यक्ती आश्चर्यकारक आहे! अनेक मुलाखती दिल्या पण नोकरी मिळाली नाही, अशा प्रकारे खूप ऑफर्स आल्या
लंडन. मूळच्या लंडनमधील पाकिस्तानातील एका व्यक्तीने कोरोना व्हायरस कोविड-19 महामारीच्या ...

50 लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू,परळी ...

50 लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू,परळी वैद्यनाथ मंदिर समितीला आले धमकीचे पत्र
बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीला “वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले ...

उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षांत महाराष्ट्राची 'या' 7 ...

उद्धव ठाकरे सरकारच्या दोन वर्षांत महाराष्ट्राची 'या' 7 क्षेत्रांत प्रगती झाली  की नाही?
अनेक आठवड्यांच्या संगीत खुर्चीनंतर 28 नोव्हेंबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत ...

Indonesia Open 2021: पीव्ही सिंधूचा प्रवास उपांत्य फेरीत ...

Indonesia Open 2021: पीव्ही सिंधूचा प्रवास उपांत्य फेरीत संपला, थायलंडच्या रचानोक इंतानोने पराभूत केले
इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही ...