जागतिक कुटुंब दिवस
कुटुंब काय असतं, तेच तर सर्वव असतं,
तुझं माझं त्यात नसतं, त्यात फक्त आपलं असतं,
डोळे अनेक असलेत ना, तरी दुःख एकच,
कारण खुशीच जरी एकच, तरी खुश सर्वच,
एक आला नाही तरीही, जेवायला थांबणार सारे,
कुणाचं काही बिनसलं, की घरात चिंतेचे वारे,
सण, समारंभा ची शान तर आपलं कुटुंब च ना?
एकटेपण कधी जाणवत च नाही, ही एक जादूच ना?
लहान सान सारेच असतात कुटुंबात, समतोल असतो,
म्हणून तर माणूस कुटुंबात कुठं एकटा पडतो?
असावं प्रत्येकाच एक आपलं कुटुंब,
तोच तर जीवनाचा महत्वाचा आधारस्तंभ!!
...अश्विनी थत्ते