कृती---- भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.