दीपावलीच्या दुसर्या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला वसुबारस पूजा केली जाते. या दिवशी गोपूजन केले जाते. काही भागात दारात शेणाची गोवर्धन पर्वताची प्रतिकृती उभारून पूजा केली जाते. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताखाली गाई गुरांना एकत्र करून त्यांचे रक्षण केले होते, त्याबद्दल या पर्वताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पूजन करण्यात येते.
गोवर्धन पूजा कशी करावी? सकाळीच लवकर उठून शरीराला तेल लावून स्नान करावे. नंतर स्वच्छ कपडे परिधान करून ध्यान करावे. आपल्या घराच्या किंवा देवघराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करा. पर्वतावर झाडाच्या फांद्या किंवा फुलांनी सजावट करा. नंतर अक्षता आणि फूलांनी पर्वताची विधिवत पूजा करा. पूजा करताना खालील प्रार्थना म्हणा.
या दिवशी प्रामुख्याने गायीचे पूजन करतात गायीला विविध अलंकार आणि मेंदीने सजवा. त्यानंतर गंध, अक्षता आणि फूलांनी पूजा करा. नैवद्य अर्पण करून खालील मंत्र म्हणून प्रार्थना करा.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा पूजन या दिवशी लोक गाय-बैल आणि इतर प्राण्यांना आंघोळ घालून त्यांची पूजा करतात. गायीला मिष्ठान्न खाऊ घालून तिची आरती करून प्रदक्षिणा घातली जाते. अनेक प्रकारच्या पक्वान्नांचा पर्वत तयार करून त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी दैत्यराज बलीची पूजा केली जाते.