सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (20:03 IST)

मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार

maharashtra police
मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे...गृहखात्याने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय...आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या मदतीला आता तीन हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.  
 
मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गृहखात्याने हा निर्णय घेतलाय. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांतून कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी किंवा भरती प्रक्रियेपर्यंत ही पोलीस भरती केली जाणार आहे.  विशेष म्हणजे या पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव करण्यात आलाय.
 
या कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल विचारलाय. सगळ्याच नोक-या कंत्राटी झाल्या तर आरक्षणाचं काय? कंत्राटी भरतीतून भ्रष्टाचार केला जातोय असा गंभीर आरोप सुळेंनी केला आहे. तसंच वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सरकारला दिला आहे.