शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (13:17 IST)

Airport Authority Jobs 2021 भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये बंपर रिक्त जागा, परीक्षे न देता नोकरी मिळू शकते

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी AAI ने ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिस च्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, ज्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केला आहे ते लवकरात लवकर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. विमानतळ प्राधिकरणाने 90 शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. 
उमेदवारांची निवड भरती चाचणी/मेरिटच्या आधारे केली जाईल. याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
 
भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - 1 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021
भरती चाचणी / गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची तारीख - अद्याप निर्णय घेतलेला नाही
आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे ते काही पदांसाठी अर्ज करू शकतात. तर इतर पदांवर, संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिसूचना पाहू शकता.
 
याप्रमाणे अर्ज करू शकतात
शिकाऊ उमेदवारांच्या या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांना प्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero/en ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला करिअर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर या भरतीशी संबंधित माहिती तुमच्या समोर येईल. तुम्हाला त्यामध्ये अर्ज करण्याची सूचना आणि लिंक मिळेल. तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रमही वेबसाइटवर मिळेल.