सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (08:56 IST)

10वी/12वी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची संधी, तब्बल 2049 जागांवर भरती

तुम्हीही दहावी, बारावी पदवीधर असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे ही भरती केंद्र सरकारच्या मंत्रालयांसाठी होणार असून स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ही भरती केली आहे. त्यासाठी आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SSC Selection Posts Bharti 2024
 
पदांनुसार पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांना SC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीद्वारे एकूण 2049 जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अजितबात वेळ वाया न घालवता मुदतीपूर्वी अर्ज करावा.
 
या पदांसाठी होणार भरती
1) लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2) लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3) मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4) नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5) फार्मासिस्ट (Pharmacist)
6) फील्ड मन (Fieldman)
7) डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9) अकाउंटेंट (Accountant)
10) असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा
 
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 100
 
Edited by: Ratnadeep Ranshoor