शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (22:38 IST)

नॉन-आयटी कंपन्यामध्ये नोकरीसाठी डिजिटल कौशल्ये आवश्यक: श्री हर्ष भारवानी

jetking
विशिष्ट नोकरी-संबंधित कार्ये पार पाडण्यासाठी तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेत. तांत्रिक कलागुणांना माहिती तंत्रज्ञान, संगणक, अभियांत्रिकी, संशोधन, विश्लेषण, प्रोग्रामिंग, विपणन, डिझाइन, सुरक्षा आणि संगणक विज्ञान मधील विशेष ज्ञान आणि प्रवीणता आवश्यक आहे. ही व्यावहारिक कौशल्ये तुम्हाला तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये भरभराट होण्यास मदत करतात आणि त्यामध्ये सामान्यतः मेकॅनिक्स, गणित, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण समाविष्ट असते. 
 
श्री. हर्ष भारवानी, जेटकिंग इन्फोट्रेन सीईओ आणि एमडी म्हणाले कि, “आजच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत नवोदित विद्यार्थ्यांना तसेच उमेदवारांना तांत्रिक कौशल्ये अवगत असणे गरजेचे आहे. त्यामध्ये AI (आर्टिफिशिअल टेक्नॉलॉजी), ब्लॉकचेन, व्हिडिओ प्रोडक्शन, डिजिटल मार्केटिंग, प्रोग्रामिंग, डेटा सायन्स आणि कंप्यूटर ग्राफिक्स अशी महत्वाची कौशल्ये आहेत. अनेक कंपन्या उमेदवार शोधताना या तांत्रिक कौशल्यांचा शोध घेतात. त्यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सध्याच्या घडीचे आघाडीचे नोकरी देणारे तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये डेटा सुरक्षित करणे आणि ते बदलणे किंवा हॅक करणे अशक्य बनवते. हे एक डिजिटल व्यवहार खातेवही आहे जे सुरुवातीला डिजिटल चलन बिटकॉइनसाठी डिझाइन केले होते. क्राउडफंडिंग, आयडेंटिटी मॅनेजमेंट, फाइल स्टोरेज, व्यक्ती-टू-व्यक्ती पेमेंट आणि डिजिटल व्होटिंग हे त्याच्या अनेक ऍप्लिकेशन्सपैकी आहेत. त्यामुळे इतर तांत्रीक कौशल्यांपैकी हे एक नाविन्यपूर्ण कौशल्य आहे.”
 
नवीन युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होताना पाहायला मिळत आह. त्याचसोबत नोकऱ्यांची संधी सुद्धा वाढत आहे परंतु, योग्य कौशल्ये नसल्यास अशा सुवर्ण संधीला उमेदवार मुलकात आहेत. म्हणूनच तांत्रिक कौशल्ये आणि त्याचे ज्ञान अवगत असणे महत्वाचे झाले आहे