शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

दिवाळीला बनवा कुरकुरीत असा मक्याचा चिवडा

Cornflakes Chivda
साहित्य-
मक्याचे पोहे-दोन वाट्या
शेंगदाणे-अर्धी वाटी
काजू-दोन चमचे
मनुके-दोन चमचे
तेल-तीन चमचे
मोहरी-अर्धा चमचा
कढीपत्ता 
हळद-१/४ चमचा
लाल तिखट-अर्धा चमचा 
मीठ चवीनुसार
पिठी साखर-एक चमचा 
कृती-
सर्वात आधी मक्याचे पोहे एका कढईत तळून घ्या आणि थंड होऊ द्या. आता कढईत तेल गरम करून शेंगदाणे, काजू आणि मनुके तळून घ्या. बाजूला काढून ठेवा. त्याच तेलात मोहरी, कढीपत्ता, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा. मक्याचे पोहे आणि तळलेले शेंगदाणे, काजू, मनुके घालून मिक्स करा. आता मीठ आणि पिठी साखर घालून दोन मिनिटे परता. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. तसेच मक्याचे पोहे आधीच कुरकुरीत असतात, त्यामुळे जास्त तळण्याची गरज नाही.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik