1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (13:58 IST)

Indian Army भारतीय सैन्यात 10वी आणि 12वी उत्तीर्ण गट सी पदांसाठी भरती

Indian Army Recruitment for 10th and 12th pass Group C posts in Indian Army
भारतीय लष्कराने तोफखाना विभागातील गट सी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. आर्टिलरी देवळाली आणि आर्टिलरी रेकॉर्ड नाशिकने लिपिक, सुतार, कुक, बार्बर, लस्कर, एमटीएस, वॉशरमन, दुरुस्ती अशा विविध पदांसाठी 107 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2022 आहे.
 
पदांची तपशील
एलडीसी - 27
मोडल मेकर - 1
कारपेंटर - 2
कुक - 2
रेंज लास्कर - 8
फायरमैन - 1
आर्टि लास्कर - 7
बारबर - 2
वाशरमैन - 3
एमटीएस गार्डनर - 2
एमटीएस  वाचमैन - 10
एमटीएस  मैसेंजर - 9
एमटीएस  सफाईवाला - 5
सायस- 1
एमटीएस  लास्कर - 6
इक्यूपमेंट रिपेयरर - 1
एमटीएस  - 20
 
पदांमध्ये आरक्षण 
अनारक्षित - 52 पद
एससी - 08 पद
एसटी - 07 पद
ओबीसी - 24 पद
ईडब्ल्यूएस - 16 पद
पीएचपी - 06 पद
ईएसएम - 18 पद
एमएसपी- 03 पद 
 
शैक्षणिक पात्रता: LDC च्या पदांसाठी 12वी पास आणि टायपिंगचे ज्ञान मागितले आहे.
MTS पदांसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
इतर सर्व पदांमध्ये काहींसाठी फक्त 10वी पास तर काहींसाठी 10वी उत्तीर्ण व्यतिरिक्त अनुभव मागितला आहे.
 
वय श्रेणी
सामान्य श्रेणीसाठी - 18 वर्षे ते 25 वर्षे.
SC, ST साठी - 18 ते 30 वर्षे.
OBC साठी - 18 ते 28 वर्षे.
 
अर्ज कसा करायचा
इच्छुक उमेदवारांनी पोस्टाने अर्ज करावा.
तुमचा अर्ज या पत्त्यावर पाठवा-
कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, पिन - 422102
अर्जाच्या पाकिटावर पदाचे नाव आणि श्रेणी लिहिणे आवश्यक आहे.
 
आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. लेखी परीक्षेत 0.25 टक्के गुणांचे नकारात्मक गुण असतील. सविस्तर अधिसूचना एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये (डिसेंबर 25- 31डिसेंबर) पाहता येईल.