दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मुंबई पोस्टात नोकरीची संधी
भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे. स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती निघाली आहे. इच्छुकांना भारीतय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.
एकूण पद-12
यापैकी 4 पदं ओबीसी आणि प्रत्येकी 1 पद एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखील ठेवण्यात आलं आहे.
अट
10 उत्तीर्ण
वाहन चालवण्याचा परवाना
किमान वयोमर्यादा 18 वर्षे
कमला वयोमर्यादा 27 वर्षे
निवड प्रक्रिया
वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार
पोस्टिंग स्थान
मुंबई
पगार
दरमहा 19,900 रुपये