बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (08:55 IST)

बाप्परे, लघुशंका करत असताना हटकलं म्हणून सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवडमध्ये बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत असताना हटकलेलं म्हणून सुरक्षारक्षकाला रिक्षा चालकाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात सुरक्षारक्षक २० टक्के भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडलेली आहे. याप्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर भगवान वायफळकर (४१) असं जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचं नाव असून महेंद्र बाळू कदम (३१) असं आरोपी रिक्षाचालकाचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
या घटनेत, शंकर भगवान वायफळे हे सुरक्षारक्षक आहेत. कंपनीच्या गेटवर ते कर्तव्य बजावत होते. तेव्हा, आरोपी रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम गेटजवळ कंपनीच्या मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत होता. त्यावेळी शंकर यांनी हटकलं आणि लघुशंका करण्यास मज्जाव केला. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि आरोपी कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला.  मात्र, रिक्षाचालक महेंद्र कदमच्या मनात शंकर यांच्याविषयी चीड निर्माण झाली. व साडे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा येऊन बाटलीतून आणलेलं पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून जिवंत जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. शंकर गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे.