मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (17:34 IST)

क्रुरतेची मर्यादा ओलांडली, चारित्र्यावर संशय घेते महिलेचे स्तन कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणे खुपसले

नागदा- मध्यप्रदेशच्या नागदा जिल्ह्यात अत्यंत क्रूर व्यवहाराची बातमी समोर आली आहे जिथे सासू, सासरे आणि नवर्‍याने असे काही कृत्य केले जे ऐकून संताप येणे साहजिक आहे. एका महिलेची जीभ, गाल आणि स्तन कापले कारण तिच्या चारित्र्यावर शंका होती. या कामात नात्यातील एका आणखी महिलेने साथ दिली.
 
सूत्रांप्रमाणे केवळ अवयव कापून त्यांचे मन भरले नाही तर त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणे खुपसले. महिला बेशुद्ध पडल्यावर तिला मृत समजून घराबाहेर फेकले आणि सर्वांनी तेथून पळ काढला. सुमारे 10 मिनिटे महिला रस्त्यावर अशाच अवस्थेत पडलेली होती. पण कुणालाही दया आली नाही. हे प्रकरण नागदाच्या विद्यानगर येथील आहे.
 
सूचना मिळाल्यावर पोलिसांनी महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जेथून तिला इंदूर शहरात हालवण्यात आले. सध्या तिची स्थिती गंभीर आहे. बिरलाग्राम ठाणा पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि इतर एक महिलेविरुद्ध प्रकरण दाखल केले असून पती राजेश सोलंकी, सासरे सीताराम, सासू गोंदाबाई आणि मावस सासू कलाबाई अशा चौघांना अटक केली आहे.
 
पीडित महिलेचं ड्राइवर राजेशसोबत 15 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांना 14 आणि 5 वर्षाचे दोन मुलं आहेत. महिला घटनेच्या काही दिवसांपूर्वीच आपल्या एका नातेवाइकांकडे गेली होती आणि सोमवारी म्हरजे 11 जानेवारी रोजी राजेश तिला परत घेऊन आला होता.