शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (17:25 IST)

श्रीरामाची एकमेव चतुर्भुजी मूर्ती, जाणून घ्या रोचक माहिती

मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मांडू (मांडव) म्हणून ठिकाण आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच ऐतिहासिक धरोहर आणि त्याच बरोबर धार्मिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. आपणास माहिती नसेल पण संपूर्ण जगातील प्रभू श्रीरामाची एकमेव चतुर्भुजी प्रतिमा येथेच आहे. संवत 957 इ. मध्ये श्रीरामाच्या देवळात या चतुर्भुजी मूर्तीची स्थापना केली गेली. संपूर्ण वर्षभर भाविक येथे दर्शनास येतात. रामाच्या या चतुर्भुजी स्वरूपात रामाच्या एका हातात धनुष्य, एका हातात बाण, तसेच अजून दोन्ही हातात एकात कमळ आणि एकात माळ घेतलेली आहे. 
 
प्रभू रामाची ही मूर्ती रामाच्या वनवासाच्या काळातील असावी अशी आख्यायिका आहे. या देवळात राम, सीता, लक्ष्मण अश्या तिन्ही मूर्ती स्थापित आहे. ज्याकाळी मुघलांचे शासन होते आणि मंदिरांना नष्ट करत होते त्या वेळेस संतांनी या दिव्य मूर्तीला तळघरात दडवून ठेवले होते. एकदा पुण्याचे संत शिरोमणी रघुनाथदास महाराज फिरत-फिरत मांडूला विश्रांती घेण्यासाठी येथे विसावले तेव्हा रात्रीला त्यांना स्वप्नात श्रीरामाने दर्शन देऊन सांगितले की लाल दगडाने बनलेल्या मोठ्या दाराच्या आत जाऊन एका उंबराच्या झाडाखालील एका तळघरात रामाच्या मूर्तीला जन कल्याणासाठी बाहेर काढावे. यावरून रघुनाथ दास महाराजांनी तात्काळीन धारच्या महाराणी सुखमाबाई पवार यांना सर्व सांगितले. त्यांनी आपल्या लाव-लष्कराला सोबत घेऊन सांगितल्याजागी खणवायला सुरू केले. खणताना कुदळ एका मोठ्या दगडाला आदळले. दगडाला बाजूस केल्यावर त्यांना तळघर दिसले, त्यामध्ये त्यांना अखंड नंदादीप प्रज्वलित आहे असे दिसले. त्याच बरोबर त्यांना चतुर्भुजी श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती दिसली. हे नंदादीप कधीपासून प्रज्वलित आहे या बद्दल कोणास काहीच माहिती नाही. 
 
भव्य मूर्ती आणावयाची कशी आणि स्थापित करावयाची कोठे? हा प्रश्न पुढे आला. त्या काळी मांडव हे निर्जन स्थळ होते. त्या मुरत्यांना हत्तीवर ठेवून नेण्यात आले, पण हत्ती त्या भव्य मूर्तींचे भार सहन करू शकले नाही आणि खालीच दमून बसले की ते परत उठलेच नाही. त्या मुरत्यांना हत्तीवरून काढून मांडूलाच लाल दगडाच्या मोठ्या देवळाचे निर्माण केले आणि मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. रघुनाथदास महाराजांना तिथले महंत म्हणून ठेवण्यात आले. संवत 1823 मध्ये या देवळाच्या सोबत त्या पटांगणात 7 अजून देऊळ बांधण्यात आले. येथे 1250 वर्ष जुनी सूर्याची मूर्तीसाठी नवग्रहांच्या देवळाचे निर्माण केले आले.