शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जुलै 2020 (08:47 IST)

राम मंदीर भूमीपूजन सोहळा, मोदी येणार, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जाणार असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भानही यादरम्यान ठेवण्यात येईल. या कार्यक्रमात १५० निमंत्रितांसह एकूण २०० पेक्षा अधिक जण सहभागी होणार नाहीत,” अशी माहितीही स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली.
 
“शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे,” असंही स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले.