रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (09:18 IST)

दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

disability-welfare
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा [email protected] या ईमेलवर पाठवावे.
 
या पदासाठी शैक्षणिक अर्हता-  संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 
या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.
 
अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर  किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.