सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (22:13 IST)

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विद्युत मंडळ येथे भरती; जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर (Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Chandrapur) मध्ये लवकरच पदभरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. (MAHATRANSCO Recruitment 2021)
 
पदे – एकूण जागा 30
– अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
– अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) – या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.
 
वयाची अट –
– वय 18 ते 33
ही कागदपत्रं आवश्यक –
– 10 वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं डोमेसिएल प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे सर्व प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. (MAHATRANSCO Recruitment 2021)
– पदभरतीसाठी उमेदवारांची निवड 10 वी आणि ITI च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.