गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (09:06 IST)

पत्रकारितेची पदवी असलेल्यांना सरकारी नोकरीची उत्तम संधी ; तब्बल ‘इतका’ पगार मिळेल

jobs
जर तुमच्याकडेही पत्रकारितेची पदवी असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ‘सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी’ या पदासाठी ही भरती निघाली आहे. वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.  MahaGenco Bharti 2024
 
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 45,800/- रुपये ते 1,15,905/- रुपये पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 आहे.
 
एकूण जागा : 01
आवश्यक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 02) इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.
 
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 944/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.