बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: रविवार, 4 जून 2023 (11:27 IST)

Maharashtra Talathi Recruitment 2023 :महाराष्ट्रात तलाठी पदाच्या 4,625 जागांसाठी भरती

jobs
राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली  जाणार असून या बाबत सरकारने आदेश काढले आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान मेगाभरती होणार आहे. 

महसूल व वन विभाग कडून निघालेल्या आदेशात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या बाबत जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 
उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तलाठी भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबवली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या त्या जिल्ह्यात पद भरतीचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीही कोणताही संबंध नसण्याचे कळविण्यात आले आहे. 
परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 

Edited by - Priya Dixit